पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चाकण येथील रांका ज्वेलर्सच्या दालनाचे उद्घाटन केले. या वेळी त्यांनी सोन्याची चेन गळ्यात घालणाऱ्या पुरुषांवर थेट टोला लगावला. अजित पवार आपल्या मिश्किल वक्तव्यासाठी ओळखले जातात आणि आजच्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना-हसवत एक महत्त्वाची सूचना दिली.अजित पवार म्हणाले, “सोनं पुरुषांच्या अंगावर नाही तर ते आपल्या माता ,पत्नी,बहिणआणि मुलीवर शोभून दिसते . पुरुषांनी या भानगडीत पडू नका.” ते पुढे म्हणाले की “उगाचच बैलाच्या गळ्यात जशी साखळी घालतो, तशीच काही पुरुष सोन्याची साखळ्या घालतात. खरंतर ते आपल्या पैशाने करतात, मला यावर काही बोलण्याचा अधिकार नाही.” या विधानावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.यावेळी अजित पवारांनी महाराष्ट्रातील पुराचे संकट आणि शेतकऱ्यांसाठी मदतीबाबतही भाष्य केले. “पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन दिलं आहे. विविध विभागांची मदत आवश्यक आहे. दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचं आमचं नियोजन आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या सकारात्मक निर्णय होतील,” असे त्यांनी सांगितले.याशिवाय, अजित पवार यांनी भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरही भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, ‘यश मिळाल्यानंतर भारतीयांना आनंद वाटतो, पाकिस्तानने ज्या काही कुरघुड्या केल्या, ऑपरेशन सिंदूर नंतर झालं. त्यानंतर खेळायला नको असं काहीचं मत होतं. ज्यांच्या घरातील व्यक्ती गेली, त्यांचं म्हणणं होतं खेळायला नको आणि काहींचं म्हणणं होतं खेळात हे सगळं नको. मात्र आता सामने संपलेले आहेत.’
read also : https://ajinkyabharat.com/congresscha-amit-shahana-patra/