ऐश्वर्या नारकर यांनी दिला डोंबिवली लोकल प्रवासाच्या आठवणींना उजाळा

मुंबई- सतत धावणाऱ्या मुंबईचा जीव म्हणजे मुंबई लोकल. दिवसाला लाखो करोडो नागरिक या ट्रेनच्या आधारे मुंबईच्या कानाकोपऱ्यात प्रवास करत असतात. ट्रेन थांबल्यावर पुढची १५ सेकंद किती महत्त्वाची आहेत हे फक्त मुंबईकरालाच ठाऊक. या १५ सेकंदात त्यांना त्यांच्या प्रवासाची दिशा गाठायची असते त्यामुळे रेलचेल करत, धक्काबुक्की करत या ट्रेनमध्ये चढण्याचा अट्टाहास सगळ्यांचा पक्का झालेला असतो.

गेल्या काही वर्षात महागाई आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील कमालीची वाढलेली पाहायला मिळते. ट्रेनमध्ये सीटवर बसणं सोडाच पण एका कोपऱ्यात निवांत उभं राहायला भेटणं हे देखील नशीबच म्हणावं लागतं.

ट्रेन मधून जाताना अनेकांचा एक मित्रपरिवार ही तयार होतो. घरात वेळ मिळाला नाही तर स्त्री वर्ग या लोकललाच आपला किचन चा ओटा बनवून तिथे भाजी साफ करण्याचं काम देखील करतात. बाहेर बाजारात मिळणाऱ्या गोष्टी ट्रेनमध्ये स्वस्त मिळतात म्हणून हे एक शॉपिंग सेंटर देखील असतं. अशी ही मुंबईची लोकल प्रत्येक मुंबईकराच्या जीवाभावाची असते.

Related News

सध्या ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या गर्दीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे बहुतांश वेळी हा प्रवास नकोसा वाटतो पण पोटापाण्यासाठी समोर कोणताच पर्याय उरत नसल्याने रोज जीवावर बेतून हा प्रवास सुरूच असतो. बाहेर रस्त्यांवर हल्ली बेफाम ट्राफिक मिळते त्यामुळे सुद्धा प्रवासी लोकांना पसंती देतात.

आजकाल तर फक्त सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर टीव्ही सिनेमात काम करणारे कलाकार देखील आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी रेल्वे किंवा मेट्रोला पसंती देताना पाहायला मिळत आहेत.

किंबहुना आजच्या काळात स्टार म्हणून लोकप्रिय असलेले हे कलाकार त्यांच्या संघर्षाच्या काळात याच लोकल ने प्रवास करत असत.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हा टीव्ही इंडस्ट्रीजचा एक लोकप्रिय चेहरा. नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ सोबतच त्यांनी दिलेलं कॅप्शन सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतयं. व्हिडिओमध्ये ऐश्वर्या बेडवर झोपले आहेत आणि बॅकग्राऊंडला ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ ही प्रार्थना ऐकू येते.

तसेच व्हिडिओवर त्यांनी कॅप्शनमध्ये डोंबिवली फास्ट मधून प्रवास करताना कळायचं… ही प्रार्थना शाळेत का शिकवली असे लिहिले आहे. म्हणजेच ऐश्वर्या ना म्हणायचं आहे की ट्रेनमधून प्रवास करत असताना देवा मला सुखरूप प्रवास करायची ताकद दे असं हे गाणं सुचित करतं.

Related News