‘याचना नाही आता रण होईल’

'याचना नाही आता रण होईल'

१२ मे २०२५ | नवी दिल्ली

पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने केलेल्या निर्णायक कारवाईनंतर,

“ऑपरेशन सिंदूर” संदर्भात सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेच्या ओजस्वी ओळींनी सुरुवात झाली.

Related News

भारतीय हवाई दलाचे वायू संचालन महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती यांनी ही पत्रकार परिषद सुरू करताना

दिनकर यांची प्रसिद्ध कविता ‘रश्मिरथी’ यातील ओळींचा उल्लेख करत, भारताचा संदेश स्पष्ट केला – “याचना नाही आता रण होईल, जीवन जय की मरण होईल!”

त्याच वेळी त्यांनी तुलसीदास यांचेही शब्द उद्धृत करत स्पष्ट केलं की भारत

आता केवळ विनवण्या करणार नाही, तर दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठराखणाऱ्या यंत्रणांना कठोर उत्तर दिलं जाईल.

लेफ्टिनंट जनरल राजीव घई यांनी आपली माहिती देताना स्पष्ट केलं की, “भारताने सीमा ओलांडली नाही,

पण पाकिस्तानकडून त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने प्रत्येक हल्ला अपयशी ठरवला.”

पत्रकार परिषदेत ‘ऑपरेशन सिंदूर’चा एक शक्तिशाली व्हिडिओ दाखवण्यात आला,

ज्यामध्ये दिनकर यांची कविता पार्श्वसंगीत म्हणून वापरली गेली होती. यामुळे भारताने

केवळ सैनिकी ताकद नव्हे तर सांस्कृतिक आणि नैतिक संदेशही देण्याचं तंत्र वापरलं.

घई यांनी शेवटी म्हटलं, “हौसले बुलंद असतील तर यश तुमचे पाय धरते.”

हे विधान ऑपरेशन सिंदूरच्या यशावर शिक्कामोर्तब करत होतं.

Read Also : https://ajinkyabharat.com/virat-kohlicha-test-cricketmadhun-retirement/

Related News