प्रशासनाचा नागरिकांना इशारा

पावसाचे संकट

महाराष्ट्र : गेल्या काही दिवसांपासून राज्यावर पावसाचे जोरदार संकट पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली असून धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. भारतीय हवामान विभागाने मुंबईसह कोकण-विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

राज्यात पुढील पाच दिवस पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा आहे. काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः –

रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सोलापूर आणि मराठवाडा : मुसळधार पाऊस

मुंबई, ठाणे, पालघर : हलका ते मध्यम पाऊस

कोकण आणि विदर्भ : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात पावसाचा जोर वाढल्याने मॉर्निंग वॉकसाठी आलेले नागरिक आणि पर्यटक पावसाचा आनंद घेताना दिसले. तरीही पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.

मरगा तालुक्यातील मुरूम परिसरात जोरदार पाऊस मुळे जनजीवन विस्कळीत झाले. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व मुसळधार पाऊस हजेरी लावली. पहाटेपर्यंत पडलेल्या पावसाने मुरूम करांची दाणादाण उडाली, सखोल भागांतील रस्ते पाण्याखाली गेले आणि काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.

सततच्या पावसामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रसार वाढत आहे. पुण्यातील बालरोगतज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार ताप, सर्दी-खोकला, अतिसार यांसह नवजात बालकांमध्ये रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस चा संसर्ग वाढला आहे.

शेतकरी आणि नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे वाहतूक, शेती आणि घरांवरील धोके लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

read also :https://ajinkyabharat.com/illegal-bannercha-susuat/