अदानी ग्रुप आणि Google ने केला करार!

गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहाने टेक जायंट

Google सोबत एक करार केला आहे. गुगलने ‘गुगल फॉर

इंडिया’ कार्यक्रमात या कराराची घोषणा केली, तर अदानी समूहाने

Related News

एका निवेदनात याबाबत सविस्तर माहिती दिली. या भागीदारीद्वारे

अदानी समूह गुजरातमधील खवरा येथील जगातील सर्वात मोठ्या

रिन्युएबल एनर्जी प्रकल्पात असलेल्या नवीन सौर-पवन संकरित

प्रकल्पातून क्लीन एनर्जीचा पुरवठा करेल. हा नवीन प्रकल्प

2025 च्या तिसऱ्या तिमाहीत सुरू होण्याची अपेक्षा आहे.

रिपोर्ट्सनुसार, या पवन, सौर ऊर्जा प्रकल्पामुळे व्यावसायिक

आणि औद्योगिक ग्राहकांच्या उर्जेच्या गरजा पूर्ण होतील.

याशिवाय, वातावरणात पसरणारे कार्बनडायकॉक्साइट कमी

करण्यास मदत होईल. या भागीदारीद्वारे Google चे 24/7

कार्बन मुक्त ऊर्जा उद्दिष्ट पुढे नेण्यास मदत होईल आणि

भारतातील क्लाउड सेवा आणि ऑपरेशन्स स्वच्छ ऊर्जेसह सक्षम

होतील. अशा प्रकारे Google च्या भारतातील शाश्वत वाढीस

हातभार लागेल. अहमदाबादमध्ये मुख्यालय असलेला अदानी

समूह हा भारतातील सर्वात मोठा आणि वैविध्यपूर्ण व्यवसायांचा

सर्वात वेगाने वाढणारा समूह आहे. ऊर्जा आणि उपयुक्तता,

वाहतूक आणि लॉजिस्टिक्स (बंदरे, विमानतळ, शिपिंग आणि

रेल्वेसह), नैसर्गिक संसाधने आणि ग्राहक क्षेत्रामध्ये अदानी

समूहाने आपले स्थान मजबूत केले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/prakash-ambedkarna-ramdas-athawalenkadu-mothi-offer/

Related News