चार वर्षांनंतर फरार आरोपीला अटक: पोलीस हत्येच्या प्रयत्नातील आरोपीला धाराशिवमधून अटक

अकोला, दि. 16: चार वर्षांपूर्वी अकोल्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला करून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीला अखेर सिटी कोतवाली पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

2021 साली अकोल्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर सुनील नावाच्या व्यक्तीने चाकूने हल्ला करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

हल्ल्यानंतर आरोपी सुनील समुद्रे फरार झाला होता आणि तब्बल चार वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

Related News

आरोपीविषयी केवळ “सुनील” हे नाव उपलब्ध असतानाही सिटी कोतवाली पोलिसांनी तपास सुरू ठेवला.

दीर्घ तपासानंतर आरोपी सुनील समुद्रे याचा ठावठिकाणा शोधून धाराशिव जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली.

अटक केल्यानंतर आरोपीला अकोला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करत असून आरोपीच्या फरारी काळातील हालचालींची तपासणी केली जात आहे.

चार वर्षांपासून चाललेल्या या प्रकरणात अखेर यश मिळाल्याने सिटी कोतवाली पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/where-is-the-safe-nature-right-now-request-issued-by-lilavati-what-is-the-name-of-it/

Related News