Abu Azmi Suspension : अबू आझमी यांचे विधानसभेतून निलंबन, औरंगजेब उदात्तीकरण प्रकरण भोवलं

Abu Azmi Suspension : अबू आझमी यांचे विधानसभेतून निलंबन, औरंगजेब उदात्तीकरण प्रकरण भोवलं

समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले.

यावरुन आता विधीमंडळामध्ये एकमताने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये मोठी घडामोड घडत आहे.

Related News

समाजवादी पक्षाचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांचे विधानसभेतून निलंबन करण्यात आले आहे.

आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक करणारे वक्तव्य केले होते. यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देखील जोरदार टीका केली होती.

भाजपा आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील अबू आझमी यांना निलंबित करण्यात यावे असा प्रस्ताव मांडला.

हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला आहे. त्यामुळे अबू आझमी हे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निलंबित असणार आहेत.

औरंगजेबाचे उदात्तीकरण प्रकरण हे अबू आझमी यांना भोवले आहेे.

Related News