Raosaheb Danve BJP : भाजपचे रावसाहेब दानवे म्हणजे एकदम रांगडी व्यक्तिमत्व.
जे मनात आले ते कोणताही मुलाहिजा न ठेवता बोलून मोकळं व्हायचं, असा त्यांचा स्वभाव,
पण याचमुळे ते अनेकदा वादात सापडतात.
भाजपाचे रावसाहेब दानवे यांचे काही डॉयलॉग अजरामर झाले आहेत. ते जे बोलतात त्यातून अस्सल गावरान विस्फोट होतातच
. त्यांच्या शाब्दिक चकमकीने अनेक जण घायाळच होतात असे नाही तर वाद पण आपसुकच उठतात.
शाब्दिक खेळी त्यांना जमत नाही.
Related News
ते खुलेआम, बेधडक वक्तव्य करतात. त्यांच्या बोलण्यातून खास गावरान रानमेवा कानावर येतो तेव्हा भल्याभल्याचे कान तृप्त होतात.
ते कोणताही मुलाहिजा न ठेवता बोलून मोकळं व्हायचं,
असा त्यांचा स्वभाव, पण याचमुळे ते अनेकदा वादात सापडतात. आता ही त्यांनी असंच काही तरी केलंय…
कार्यकर्ते नुसते थुंकले तरी…
तर रावसाहेब दानवे यांनी टीव्ही 9 शी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या भविष्यावर भाष्य केले.
आगामी पालिका निवडणुकीचा अंदाज त्यांनी अगोदरच मांडला. सर्व गोळाबेरीज करता, ठाकरेंची सेना संपुष्टात येण्याचा दावा केला.
बुडत्या जहाजात कोण बसतो, असा सवाल करत त्यांनी सध्याच्या उद्धव सेनेच्या गळतीवर कटाक्ष टाकला.
पण भाजपाच्या संघटन पर्व कार्यशाळेत दानवे यांनी केलेल्या वक्तव्याने वाद ओढवला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “आपली पार्टी सध्या इतकी मोठी आहे की आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी विरोधक वाहून जातील”,
असे विधान त्यांनी केले. या वक्तव्याचा संजय राऊत यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला.
राजकीय थुंका-थुंकी
कार्यशाळेतील थुंकीच्या वक्तव्याने रावसाहेबांनी नवीन वाद ओढावला. संजय राऊत यांनी पलटवार करताना थुकींचा
संदर्भ दिल्याने दोन दिवसात राजकारणात वार-प्रतिवार नाही तर थुंका-थुंकीचे सत्र पाहायला मिळाले. जनता सुद्धा तुमच्यावर थुंकली आहे
, असे प्रत्युत्तर राऊतांनी दिले. तर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले,
मग त्यांचे थुंकलेले कशाला चाटता, असा सवाल त्यांनी केला.
अब्दुल सत्तारांविरोधात पुन्हा मोर्चा
आपण अब्दुल सत्तार या व्यक्ती विरोधात नाही. मात्र त्यांची जी वागण्याची पद्धत आहे.
त्यामुळे सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील लोक नाराज आहेत,
असे दानवे म्हणाले. त्याचवेळी त्यांनी सत्तारांवर धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप केला.
एका विशिष्ट विचारधारेच्या व्यक्तींना शासनाच्या सर्व योजनाच लाभ दिल्या जात आहेत.
इतर लोकांना फायदा न मिळू देणे ही त्यांची विचारधारा आहे.
मी देखील त्यांचा विरोध करतो.
सगळेच अब्दुल सत्तार यांच्या विचारधारेच्या विरोधात आहे, असे ते म्हणाले.
सिल्लोडमध्ये पाकिस्तान सारखी परिस्थिती आहे. सिल्लोडची क्रीम चार-पाच एकाची जागा महापालिकेत घेतली.
अब्दुल सत्तारांनी मंत्रीपदाच्या काळामध्ये ज्या भानगडी केल्या त्यामुळे त्यांचे मंत्रीपद गेल्याचा टोला ही त्यांनी लगावला.
CLICK HERE FOR MORE UPDATE :