आमदार सावरकर यांच्या गोडाऊन मध्ये आढळला अत्यंत विषारी साप

आमदार सावरकर यांच्या गोडाऊन मध्ये आढळला अत्यंत विषारी साप

प्रतिनिधि, बोरगाव मंजु

आमदार रणधीर सावरकर यांच्या पळसो बडे येथे असलेल्या घरच्या गोडाऊन मध्ये तेथील मजुर शेती

आवश्यक अवजारे काढण्याकरिता गेले असता त्या मजुरांना अत्यंत मोठा विषारी साप दिसला.

Related News

तो साप पाहुन तेथील मजूर भयभीत झाले. मजुराने आरडाओरडा केला असता सर्व ग्रामस्थ सापाला पाहण्याकरिता आले.

सापाला पाहून सर्व ग्रामस्थ भयभीत झाले, तेथील उपस्थित पंकज वसु यांनी वेळेचा जराही विलंब न करता पर्यावरण संवर्धन

बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र कुमार सदांशिव यांना माहीती दिली. घटनेची माहीत मिळताच सर्पमित्र सुरज सदांशिव,सर्पमित्र प्रशांतभाऊ नागे,

प्रणय सदांशिव सर्व घटनास्थळी पोहोचले. आमदार रणधीर सावरकर यांच्या गोडाऊन वर सापाला पाहण्यासाठी

गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्या ठिकाणी भीतीजनक वातावरण निर्माण झाले होते.

अत्यंत परिश्रम केल्यानंतर सर्पमित्रांनी त्या सापाला सुरक्षित पकडले व त्या सापाविषयी ग्रामस्थांना माहिती दिली.

साप हा विषारी रसल वायपर (घोणस) लांबी 5 फूट, या सापामध्ये हेमोटॉक्सिक (Hemotoxic)नामक विष असते व हा साप खूप आक्रमक असतो.

सापाला सुरक्षित पकडून जंगलात सोडण्यात आले. पावसाळ्यामध्ये साप हे कोरडे ठिकाण शोधण्यासाठी घरामध्ये येतात सर्व ग्रामस्थ याची

काळजी घ्यावी घरांमध्ये झोपत असताना जमिनी वर झोपू नये. याची काळजी घ्यावी सतर्क रहावे कुठेही घरामध्ये साप आढळून

आल्यास मारू नये तत्काळ खालील सर्पमित्रांना संपर्क साधावा असे आवाहन सर्पमित्र कुमार सदांशिव यांनी केले.

सर्पमित्र कुमार सदांशिव ९७६७८५३२१०
सर्पमित्र सुरज सदांशिव ८८०५३९४४३८
सर्पमित्र प्रशांत नागे ९६५७ ३६०७६०

Read Also :   https://ajinkyabharat.com/ghoi-yethil-bsf-jawan-veeramrat/

Related News