आमदार पठाण यांचा आगळावेगळा वाढदिवस

आमदार पठाण यांचा आगळावेगळा वाढदिवस

अकोला

देशभरातील अस्थिर परिस्थिती — काश्मीरमधील पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ला,

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, महागाईने होरपळणारी सामान्य जनता आणि अन्यायकारक

Related News

कायद्यांमुळे पीडित समाजघटकांवर होणारा अन्याय — या पार्श्वभूमीवर आमदार पठाण यांनी

त्यांच्या वाढदिवशी कोणताही जल्लोष न करता समाजहिताचा निर्णय घेतला.

शालेय साहित्यदानाचा उपक्रम

आमदार पठाण यांनी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या, पेन,

नोटबुक्स, शालेय बॅग यासारखं शैक्षणिक साहित्य दान करण्याचं आवाहन केलं होतं.

त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिक, कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था पुढे सरसावल्या,

आणि आज मोठ्या प्रमाणावर शालेय साहित्य गोळा करण्यात आलं.

हे साहित्य लवकरच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.

शहरातून कौतुकाचा वर्षाव

अकोला शहरात आमदार पठाण यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वाढदिवस साजरा करताना फुगे आणि केक न वापरता समाजासाठी उपयोगी

उपक्रम राबवण्याचा त्यांचा निर्णय इतर लोकप्रतिनिधींनाही प्रेरणा देणारा ठरतो आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/shiv-sena-uddhav-cha-tractor-front/

Related News