आजोबा शिंदेंचा हृदयस्पर्शी क्षण
मुंबई – राजकारणातील गंभीर चर्चा, जबाबदाऱ्यांचा डोंगर आणि राज्य कारभाराचा ताणतणाव…
या सगळ्यात कुटुंबासाठी असलेले प्रेम आणि नात्यांचा गोडवा अनेकदा नेत्यांच्या खासगी क्षणातून समोर येतो.
असाच एक हृदयस्पर्शी क्षण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाईव्ह मुलाखतीत पाहायला मिळाला.
मराठा आरक्षणावर गंभीर चर्चा सुरू असतानाच अचानक शिंदे यांच्या नातवाचा गोड आवाज थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचला.
“बाबा, बाबा” अशी लाडिक हाक मारत नातवाने आजोबांचे लक्ष वेधून घेतले.
त्या क्षणी शिंदे यांच्या चेहऱ्यावरचे हास्य, कधी डोळ्यांनी इशारा करणं,
कधी हसून गप्प करणं, तर कधी हात जोडत थांबवण्याचे प्रयत्न… हे सगळं कॅमेऱ्यात कैद झालं.
थेट प्रसारणात झालेला हा प्रसंग पाहून वृत्तवाहिनीच्या अँकरलाही हसू आवरलं नाही.
“तुमच्या नातवाचा आवाज आमच्या प्रेक्षकांनाही पोहोचतोय” अशी मिश्कील टिपणी करताच शिंदेही दिलखुलास हसले.
राज्याचा कारभार, दौरे, सभा, मीटिंग्ज या सगळ्याच्या व्यापात नातवासाठी असलेले आजोबांचे प्रेम,
हा छोटासा क्षण प्रेक्षकांच्या मनाला भिडला.
गंभीर चर्चेच्या पार्श्वभूमीवर नातवंडांच्या निरागस हाकांनी रंगलेला हा हलकाफुलका क्षण सर्वांनाच भावला.
आजोबा आणि नातवाचं नातं म्हणजे दुधावरची साय… आणि तेच बंधन या मुलाखतीत सुंदरपणे झळकलं.
Read also : https://ajinkyabharat.com/bjp-nete-narayan-rane-rugnalayat-admission-tatdichi-arms-honar/