विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी होत असलेल्या
निवडणुकीसाठी दोन अपक्षांसह महायुती व महविकास आघाडीचे
एकूण १४ उमेदवारी अर्ज सादर झाले आहेत.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
महायुतीकडून भाजपने माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी आमदार परिणय फुके,
सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर
यांना उमेदवारी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने माजी खासदार भावना गवळी
व माजी खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवाजीराव गर्जे तसेच राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली आहे.
महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाने प्रज्ञा राजीव सातव यांना
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने शेकापचे जयंत पाटील यांना समर्थन दिले आहे
तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक
शिवसेना सचिव क्रिकेट बोर्डाचे सदस्य मिलिंद नार्वेकर
यांना उमेदवारी दिल्याने या निवडणुकीची रंगत वाढली आहे
महायुती आणि महाविकास आघाडीचे विधानसभेतील एकूण संख्याबळ लक्षात घेता
महायुतीला धोका नाही मात्र.
नार्वेकर व जयंत पाटील यांच्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व उमेदवारांसह अरुण जगताप आणि अजय सेंगर
या अपक्ष उमेदवारांनीही आज आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.
प्रत्येक उमेदवारासाठी १० आमदारांची प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी आवश्यक असते.
उद्या बुधवारी या सर्व अर्जाची छाननी होणार असून या छाननीत दोन अपक्षांचे अर्ज बाद होतील
नार्वेकर यांनी माघार घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल,
मात्र उमेदवारी कायम ठेवल्यास ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात राहतील
आणि त्यामुळे निवडणूक अटळ राहील मात्र संख्येची जुळवाजुळव करण्यासाठी
शिवसेनेला व जयंत पाटील याना या निवडणुकीत कसरत करावी लागणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/there-is-a-fight-between-biden-and-trump-in-the-us-presidential-election/