बकऱ्या शेतात गेल्याने महिलेला लाठीकाठीने मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मारहाण

कासवी ता. मुर्तिजापूर येथील शेतशिवारात बकऱ्या शेतात गेल्याच्या किरकोळ वादावरून एका महिलेवर लाठीकाठीने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय रेखा सुधीर धायगोळे, रा. कासवी, या मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता त्यांच्या बकऱ्या आरोपींच्या शेतात गेल्या आणि तिथले कुटार खाऊ लागले. यावरून आरोपींमध्ये वाद सुरु झाला.

मारहाण व धमकी:
आरोपी श्रीकृष्ण शामराव इंगोले यांनी रेखा यांना शिवीगाळ केली व मातीचा ढेकूळ फेकून मारहाण केली. त्यानंतर गजानन शामराव इंगोले यांनी पीडित महिलेवर हल्ला केला तर श्रीकृष्ण इंगोले यांनी लाठीने डावा हात व पायावर मारहाण केली. तिसरा आरोपी शुभम श्रीकृष्ण इंगोले देखील घटनास्थळी येऊन धमकी देत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

Related News

पीडित महिलेने त्वरित मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीसह मेडिकल सर्टिफिकेटच्या आधारे आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ११८(१), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

तपास:
सदर गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल राठोड ब.नं. १०२६ करत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हवालदार योगेश लोणकर ब.नं. २७२ यांनी पार पाडली.

read also :  https://ajinkyabharat.com/guidance-program-for-college-students-for-navya-sandhi/

Related News