High Security Registration Plate : इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात HSRN नंबरप्लेटसाठी खासगी कंपन्यांकडून दुप्पट किंवा तिप्पट रक्कम आकारण्यात येत आहे.
High Security Registration Plate : सुरक्षेच्या कारणास्तव देशातील 2019 पूर्वीच्या वाहनांच्या नंबरप्लेट
बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात त्यासाठी तीन खासगी कंपन्यांना सहाशे कोटींचे कंत्राट देण्यात आल आहे.
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
मात्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील या तीन कंपन्यांकडून नंबर प्लेट बदलण्यासाठी दुप्पट पैसे आकारले जात असल्याचं समोर आलं आहे.
ही कोट्यवधींची लूट परिवहन विभागाच्या साक्षीनेच सुरु आहे . या तीन खाजगी कंपन्यांना नक्की कोणाच्या पुढाकाराने
आणि कधी कंत्राट देण्यात आले याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी या सगळ्याबाबत संशय व्यक्त केला.
कोणत्या तीन कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं आहे?
– रॉरमेत्रा सेफ्टी सिस्टम लि. Rosmerta Safety systems LTD
– रीअर मेझॉन इंडिया लि. Real Mazon India LtD.
– एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रा. लि. FTA HSRP solutions Pvt. LtD.
महाराष्ट्र आणि इतर राज्यात नक्की किती पैसे आकारले जाणार आहेत?
दुचाकी नंबरप्लेससाठी किती रक्कम?
– महाराष्ट्र – 450
– गुजरात – 160
– गोवा – 155
– आंध्रप्रदेश – 245
– झारखंड – 300
चारचाकी नंबरप्लेससाठी किती रक्कम?
– महाराष्ट्र – 745
– गुजरात – 460
– गोवा – 203
– झारखंड – 540
– आंध्र प्रदेश – 619
अवजड वाहनांच्या नंबरप्लेससाठी किती रक्कम?
– महाराष्ट्र – 475
– गुजरात – 480
– गुजरात -232
– झारखंड – 570
– आंध्र प्रदेश -649
HSRP नंबर प्लेट कुठे मिळेल?
- transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागेल.
- यानंतर फिटमेंट सेंटरची लिस्ट सिलेक्ट करावी लागेल
- तुमच्या नजीकचे फिटमेंट सेंटर सिलेक्ट करा.
- आपल्याला मिळालेल्या तारखेच्या दिवशी फिटमेंट सेंटरला जा. तिथे गेल्यावर वेंडर आपल्या वाहनाला नंबर प्लेट बसवून देईल. नंबर प्लेट बसवून त्याची नोंद वेंडर वाहन प्रणालीत करेल.
अधिकृत वेंडरकडूनच नंबर प्लेट बसवण्याचं आवाहन
शासनाचे अधिकृत वेंडर वगळता इतर कोणत्याही ठिकाणाहून ही नंबर प्लेट बदलून घेऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
इतर ठिकाणाहून एचएसआरपी सारखी दिसणारी नंबर प्लेट बसवली तर त्या नंबर प्लेटच्या पिन नंबरची नोंद वाहन प्रणालीत होणार नाही.
वाहन प्रणालीत आपली एचएसआरटी पेंडींगवर दिसेल. त्यामुळे अधिकृत वेंडरकडूनच नंबर प्लेट बसवावं लागणार आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/watermelon-hey-kidnisathi-amritapaksha-karna-nahi-banatal-poison/