प्रथम ‘क्रिएटिव्हिटी क्लब’ चा माधमातून विद्यार्थांनी घेतले रोबोट बनवण्याचे प्रशिक्षण.

प्रथम 'क्रिएटिव्हिटी क्लब' चा माधमातून विद्यार्थांनी घेतले रोबोट बनवण्याचे प्रशिक्षण.

प्रथम’ संस्थेतील विद्यार्थ्यांनी २ दिवसीय रोबोटिक्स आणि STEM कॅम्पमध्ये रोमांचकारी अनुभव घेतले.

या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना विविध नवीन तंत्रज्ञानांचा अनुभव घेता आला,

ज्यामध्ये रोबोट्स तयार करण्याची, वर्च्युअल रिॲलिटी (VR) अनुभवाची आणि ड्रोन शो पाहण्याची संधी मिळाली.

Related News

या कॅम्पच्या दुसऱ्या दिवशी, विद्यार्थ्यांना वर्च्युअल रिॲलिटीमधून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आणि गॅलक्सीचा

पहिल्यांदाच अनुभव घेता आला. विद्यार्थ्यांनी अवकाशातील विविध घटक आणि अंतराळातील

तंत्रज्ञानाबद्दल सखोल माहिती मिळवली, ज्यामुळे त्यांच्यातील उत्साह वाढला.

‘AIR गुरुजी’चे तज्ञ श्री. मनन गढिया आणि श्री. सुयश पाटील यांच्यासोबत या कॅम्पमध्ये

विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानावर आधारित मार्गदर्शन मिळाले. त्यांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायक होते.

त्यांनी विद्यार्थ्यांना एका अनोख्या आणि आनंददायक पद्धतीने नवीन गोष्टी शिकवलेल्या,

ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला ते अनुभवताना खूप मजा आली.

विद्यार्थ्यांनी यावेळी रोबोटिक्समध्ये हाताने काम करत, रोबोट्सचे निर्माण आणि त्यांचा कार्यप्रणाली शिकली.

‘वर्च्युअल रिॲलिटी’ सेशनमध्ये विद्यार्थ्यांना अंतराळयात्रेचा एक नवा अनुभव मिळाला.

ड्रोन शोमध्ये उंच आकाशात तंत्रज्ञानाचा अद्भुत खेळ पाहून सर्वांची चांगलीच खूप ऊर्जा वाढली.

कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना केवळ शाळेतील अभ्यासावरच नाही, तर भविष्यातील तंत्रज्ञान आणि

वैज्ञानिक नवकल्पनांवरही चर्चा करण्यात आली. विद्यार्थी त्याच्याशी संबंधित चांगले अनुभव

आणि आव्हाने समजून शिकलो, आणि अनेक नवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणा घेतली.

“या दोन दिवसांत खूप मजा आली. आम्हाला नवीन तंत्रज्ञान शिकायला मिळालं, आणि रोबोट तयार करणे,

वर्च्युअल रिॲलिटीमध्ये अंतराळ देखावे पाहणे, हे सर्व अनुभव अतिशय अद्भुत होते,”

असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

हे कॅम्प विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला, ज्यामुळे त्यांचे मनोबल वाढले आणि

भविष्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित करियर निवडण्याची प्रेरणा मिळाली.

मा. शिक्षणाधिकारी रातनसिंग पवार सर यांनी आज कॅम्प ला भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

सरांनी प्रथमच्या कामाची प्रशंसा केली व पुढील कामाला शुभेच्छा दिल्या.

Read more news here : https://ajinkyabharat.com/akola-hamza-plot-yehe-main-jalwahini-footli-thousand-liter-paani-via-paanipurwatha-vishkit/

Related News