नीलम गोऱ्हेंच्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक, अकोल्यात जोरदार आंदोलन

नीलम गोऱ्हेंच्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक, अकोल्यात जोरदार आंदोलन

दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी

ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका

पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा धक्कादायक दावा त्यांनी केला.

Related News

अकोल्यात शिवसेना महिला आघाडीचं आंदोलन

या वक्तव्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाला असून,

अकोल्यात महिला आघाडीकडून नीलम गोऱ्हेंच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आलं.

कार्यकर्त्यांनी नीलम गोऱ्हे हाय हाय’च्या घोषणांनी परिसर

दणाणून सोडला, तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलनही करण्यात आलं.

आमदार नितीन देशमुखांचा निषेध

शिवसेना (ठाकरे गट) आमदार नितीन देशमुख यांनीही नीलम गोऱ्हे यांच्या

वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.

या प्रकरणावर पुढे काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/bhijwale-badam-khanyache-tremendous-benefits-or/

Related News