सोशल मीडियावरील चॅलेंज स्वीकारत एका १४ वर्षीय
मुलानं फुलपाखरु मारलं आणि तिचे अवशेष एका सिरिंजच्या
माध्यमातून स्वत:च्या शरीरात सोडले. यानंतर त्याची प्रकृती बिघडू लागली.
त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
ब्राझिलिया: सोशल मीडियावरील चॅलेंज स्वीकारत एका १४ वर्षीय मुलानं फुलपाखरु मारलं आणि
तिचे अवशेष एका सिरिंजच्या माध्यमातून स्वत:च्या शरीरात सोडले. यानंतर त्याची प्रकृती बिघडू लागली.
त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सात दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. मग त्याचा मृत्यू झाला.
Related News
ही धक्कादायक घटना ब्राझीलच्या बाहियामध्ये घडली आहे. या प्रकरणाचा तपास बाहिया पोलीस करत आहेत.
डेवी नन्स मोरेइरी असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे.
एक ऑनलाईन चॅलेंज घेत त्यानं फुलपाखरु मारुन तिचे अवशेष इंजेक्शनच्या माध्यमातून स्वत:च्या शरीरात सोडले.
यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्याला उलट्या सुरु झाल्या. त्याला नीट चालताही येत नव्हतं. चालताना त्याचा तोल जात होता.
डेवीला नेमकं काय झालंय, हे त्याच्या कुटुंबियांनाही समजत नव्हतं. अखेर डेवीनं डॉक्टरांना संपूर्ण घटनाक्रम कथन केला.
फुलपाखराला चिरडून त्याच्या शरीरातील द्रवपदार्थ इंजेक्शनमधून माझ्या शरीरात सोडलं, अशी माहिती त्यानं डॉक्टरांना दिली.
डेवी नन्सवर आठवडाभर विटोरिया दा कॉन्क्विस्टा जनरल रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु होते.
डेवीनं सोशल मीडिया ट्रेंडच्या आहारी जाऊन विचित्र कृत्य केलं नाही ना, याचा तपास पोलीस करत आहेत.
काही ब्राझिलियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, डेवी नन्स बहुधा एका प्रयोगाची नक्कल करत होता.
त्याची मााहिती त्याला ऑनलाईन मिळाली होती. पण त्यानं मृत्यूपूर्वी ही बाब नाकारली.
डेवीनं स्वत:ला इंजेक्शन टोचल्याची माहिती डॉक्टरांना दिली. ‘मी केमिस्टमध्ये एक औषध खरेदी केलं.
त्यानंतर एक मेलेलं फुलपाखरु पाण्यात मिसळलं. त्याच्या शरीरातून निघालेला द्रव,
फुलपाखराचे अवशेष आणि पाणी यांचं मिश्रण उजव्या पायात इंजेक्शनच्या माध्यमातून सोडलं,’
असं डेवीन डॉक्टरांना सांगितलं.
डेवीचा मृत्यू एम्बोलिज्म, संसर्ग किंवा एलर्जीच्या रिऍक्शनमुळे झाला असावा अशी शक्यता हॉस्पिटलच्या डॉ. रेल्वास यांनी वर्तवली.
‘त्यानं इंजेक्शनमध्ये भरलेलं मिश्रण कसं तयार केलं, याबद्दल मला कल्पना नाही. त्या मिश्रणात कोणत्या घटकांचं प्रमाण किती होतं,
याबद्दलही माहिती नाही. इंजेक्शनमध्ये हवा राहिली असावी. त्यामुळे एम्बोलिज्म होऊ शकतं,’ असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला.
More update here