कुरणखेडमध्ये सामाजिक एकतेचे दर्शन! सर्व समाजाच्या वतीने महात्मा फुले यांना सामूहिक अभिवादन

कुरणखेड

कुरणखेडमध्ये सर्व समाजाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना सामूहिक अभिवादन; सामाजिक एकतेचा दिला संदेश!

कुरणखेड : थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कुरणखेड येथे सर्व समाजाच्या वतीने सामूहिक अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माळीपुरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. विविध समाजांतील नागरिकांनी एकत्र येत महात्मा फुले यांना अभिवादन करून सामाजिक एकतेचा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचेही पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा उमाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. समाजसेवक विशाल उमाळे तथा सर्व बांधवांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सलीम बेग मिर्झा, दिनेश बोळे, किरण उमाळे, शेख रसूल, पोलीस पाटील जामणीक, रंजीत घोगरे, राम उमाळे, उमेश आटोटे, ईश्वर हरणे, राम धानोरकर, राजेंद्र इंगळे, अरुण इंगळे, दर्शन इंगळे, लक्ष्मण राऊत, स्वप्निल राऊत, पंढरी गायकवाड, विजय निकाळजे, संदीप चव्हाण, गौतम मोहोड, विनोद उमाळे, प्रतिक उमाळे, विकी उमाळे, अजय वानखडे, सचिन मोहोड, मनीष मेश्राम, जयकुमार दामोदर, समाधान आटोटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related News

याशिवाय माँ चंडिका आपत्कालीन पथक, वंदे मातरम् आपत्कालीन पथक आणि वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रतिनिधीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

महात्मा फुले हे केवळ एका समाजाचे नव्हे, तर संपूर्ण समाजाचे प्रेरणास्थान आहेत, हा विचार या सामूहिक अभिवादनातून अधोरेखित झाला. विविध समाजांतील नागरिकांनी एकत्र येऊन केलेले अभिवादन सामाजिक सलोखा, बंधुभाव, समता आणि एकात्मतेचे प्रतीक ठरले. महात्मा फुले यांच्या समतावादी विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

 

Read Also :   https://ajinkyabharat.com/mahatma-phule/

Related News