आमचा देवेंद्र अत्यंत मितभाषी; कार्यकर्त्याला मारहाण, मोहोळांचा संताप, पत्नीसह जोग कुटुंबाच्या घरी भेट

आमचा देवेंद्र अत्यंत मितभाषी; कार्यकर्त्याला मारहाण, मोहोळांचा संताप, पत्नीसह जोग कुटुंबाच्या घरी भेट

पुण्यात गजानन मारणेच्या गुंडांनी एका मिरवणुकीदरम्यान

भाजप कार्यकर्ता देवेंद्र जोगला मारहाण केली होती.

पुण्यात आल्यावर या कार्यकर्त्याची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेतली.

पुणे : पुण्यामध्ये १९ फेब्रुवारीला गजानन मारणे याच्या गुंडांनी भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.

या मिरवणुकीदरम्यान भाजप कार्यकर्ता असलेला देवेंद्र जोग तिथून समोरून दुचाकी घेऊन पुढे गेला.

त्याचा राग आल्याने तीन ते चार जणांनी पळत जाऊन तक्रारदाराला थांबवले आणि शिवीगाळ केली.

Related News

‘गाडी हळू चालवता येत नाही का, धक्का का दिला,’ असे म्हणून टोळक्याने तरुणाला मारहाण केली होती.

या घटनेवर मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त केला. ज्यावेळी मारहाणीची घटना घडली तेव्हा बाहेर

असल्यामुळे मोहोळे यांनी जोग याच्याशी फोनवर संपर्क साधला होता. मात्र पुण्यात आल्यावर पहिल्यांदा कार्यकर्त्याला भेटायला गेले.

भारतीय जनता पार्टीचा कार्यकदिल्लीमध्ये र्ता देवेंद्र जोग याला मारहाणीच्या घडलेल्या प्रकारानंतर त्याच्या

निवासस्थानी सपत्नीक जात मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेतली. तीन दिवस गुजरात आणि असल्याने पुण्यात पोहोचल्यावर

थेट देवेंद्रच्या घरी पोहोचले. देवेंद्रकडून सगळा घटनाक्रम समजून घेत त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

मारहाणीत देवेंद्रला जबर दुखापत झाली असून आरोपींनाही अटक झाली आहे.

तसेच आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र एक कर्तबगार संगणक अभियंता असून अतिशय मितभाषी आणि शांत स्वभावाचा तरुण आहे.

कोणाच्याही हकनाक वाट्याला न जाणाऱ्या देवेंद्रसारख्या तरुणाला मारहाण होते, हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही.

आज देवेंद्रच्या बाबतीत असा प्रकार घडला उद्या कोणत्याही तरुणाच्या बाबतीत होऊ शकतो.

त्यामुळे योग्य ती पावले उचलण्याबाबतही पोलीस आयुक्तांना सूचना केल्याचं मोहोळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुण्यात सोशल मीडियावर रील्स, फोटो व्हायरल करून दहशत निर्माण केली जात आहे.

पुणे पोलिस डोळे बंद करून बसले आहेत का? तरुण पिढीने यातून काय घ्यायचे? माझ्या पुण्याचे नाव खराब व्हायला नको.

लोकप्रतिनिधी म्हणून किती वेळा सांगायचे? पोलिस आयुक्त आणि सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सांगणे आहे,

की हे सर्व थांबले पाहिजे, नाहीतर आमच्या पद्धतीने काम करावे लागेल, असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांना इशारा दिला होता.

Read more news here

https://ajinkyabharat.com/narendra-rane-paratichaya-watwar-ajitadadancha-nationalist-entry/

 

Related News