“भुजबळांचा टोला: ‘तेव्हा शिंदे ज्युनिअर होते…’, चार मुख्यमंत्री बदलले पण ‘तो’ वाद कायम!”

"भुजबळांचा टोला: 'तेव्हा शिंदे ज्युनिअर होते...', चार मुख्यमंत्री बदलले पण 'तो' वाद कायम!"

महाराष्ट्राच्या राजकारणात विधानांवरून एकमेकांना खो देण्याचे राजकारण सुरू असून,

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना दावा केला की,

Related News

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय शरद पवारांचा होता.

या विधानाला छगन भुजबळ यांनी दुजोरा देत शिंदे ‘ज्युनिअर’ असल्याची टिप्पणी केली.

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांनी ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी सत्तेवर

आले असल्याचा आरोप केला होता. मात्र, राऊतांनी हा दावा फेटाळून

लावताच भुजबळ यांनीही राऊतांच्या विधानाला समर्थन दिले आहे.

भुजबळांचा नाराजीवर खुलासा

मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चांवर भुजबळ यांनी प्रत्युत्तर देताना,

“माझ्या नाराजीबद्दलचा सारा अपप्रचार माध्यमांकडूनच करण्यात आला,” असे स्पष्ट केले.

तसेच आपल्या खास शैलीत “जहाँ नहीं चाहीना, वहाँ नहीं रहना” असे वक्तव्य करत त्यांनी चर्चांना अधिक हवा दिली.

राजकीय वर्तुळात या विधानांवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असून,

महाराष्ट्राच्या सत्तासमीकरणांवर या आरोप-प्रत्यारोपांचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Click here for more updates : https://ajinkyabharat.com/rampurburdi-campus-harbhara-songani-and-kadhanila-suruvat/

Related News