बृहन्मुंबई पोलीस पगारदार पतसंस्थेच्या निवडणुकीत उमंग पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
तुम्ही आतापर्यंत सर्वसामान्य ते निवृत्त अधिकाऱ्यांना निवडणूक लढवल्याचे ऐकले
असेल पण मुंबई पोलिसांनीही निवडणूक लढवल्याचे तुम्ही ऐकले आहे का?
Related News
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर कोठारे यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. स...
Continue reading
पुण्यात एक्स्पायरी डेट उलटलेले चीज विकणे आणि पनीर व शॅम्पूवर MRP पेक्षा जास्त पैसे आकारल्याप्रकरणी ग्राहक आयोगाने रिलायन्स रिटेलला दोषी ठरवत ग्राहकाला 30 ह...
Continue reading
Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! पुढील दहा तासांत मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी
महाराष्ट्रातील नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आ...
Continue reading
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! IRCTC वेबसाइटमध्ये होणार मोठा बदल; तत्काल तिकीट बुकिंग होणार सुपरफास्ट
भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाश...
Continue reading
लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! खात्यात जमा होऊ लागले 1500 रुपये; 3000 रुपयांच्या चर्चांवरही आली मोठी अपडेट
महाराष्ट्र सरकारच्या म...
Continue reading
एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगची झंझट संपणार! आता कनेक्शनशिवाय मिळणार सिलिंडर, 5 मिनिटांत घरपोच सेवा सुरू
घरगुती गॅस सिलिंडर संपल्यानंतर बुकिंग करणे, न...
Continue reading
विनायक राऊतांच्या अडचणीत वाढ! गिरिजा राऊत प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्...
Continue reading
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’चा जगभरात डंका! नेटफ्लिक्सवर नॉन-इंग्रजी चित्रपटांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर; 192 देशांतील प्रेक्षकांची पसंती
Continue reading
शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? चर्चांवर एकनाथ शिंदेंचं स्पष्ट उत्तर; ‘ना त्यांनी संपर्क केला, ना मी’
शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? चर्चांवर एकन...
Continue reading
मोठी बातमी! शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’ नाशिकात फसलं? उद्धव ठाकरेंसमोर 15 नगरसेवकांची एकजूट; 5 कोटींच्या ऑफरचाही गौप्यस्फोट
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेना (
Continue reading
Oil Crisis : जगावर पुन्हा तेलसंकटाचे सावट; स्वतःकडे मर्यादित कच्चे तेल असूनही भारत ठरणार जगासाठी महत्त्वाचा आधार, जाणून घ्या कारण
मध्यपूर्वेतील वाढता संघर्ष, इराण-अमेरिका तणाव आणि...
Continue reading
Monsoon Diet Tips : पावसाळ्यात ‘या’ भाज्या खात असाल तर व्हा सावध! पोटाचे गंभीर आजार टाळण्यासाठी जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
पावसाळा सुरू होताच वातावरण...
Continue reading
मुंबई पोलीसही निवडणूक लढतात. पण, स्वतःच्या पगारदार पतसंस्थेसाठी.
गेल्या 100 वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या बृहन्मुंबई पोलीस पगारदार पतसंस्थेच्या निवडणुकीत मुंबई पोलिसांचे विविध पॅनेल उभे होते.
त्यात दादा सलगर यांच्या पॅनलने बाजी मारली. उमंग पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
या पतसंस्थेतील 28,060 सभासद निवडणुकीकरता पात्र होते.
त्यापैकी 10,949 मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
मुंबई पोलिसांच्या बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्था मर्यादित,
मुंबई या पतसंस्थेची 3 ऑगस्ट 1920 रोजी स्थापना करण्यात आली होती. मुंबईचे विद्यमान पोलीस
आयुक्त या पतसंस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मात्र सदर पतसंस्थेतील इतर 13
सदस्यांच्या पदासाठी दर ५ वर्षांनी निवडणूक घेतली जाते. मात्र, कोरोना काळात निवडणूक घेणे शक्य
नसल्याने तत्कालीन उमंग पॅनलला पुढे मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदत संपल्याने पुन्हा निवडणूक पार पडली.
पाच पॅनल निवडणुकीसाठी होते रिंगणात
या पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी एकूण 32,000 सदस्यांपैकी 28,060 सदस्य मतदानास पात्र होते.
प्रत्येकी 13 उमेदवार असलेले 5 पॅनल एकमेकांविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी उभे राहिले होते. उमंग, संजीवनी,
परिवर्तन, दक्षता आणि समर्थ असे पाच पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते. मुंबईतील सर्व 99 पोलीस ठाणे,
विशेष शाखा कार्यालये, पोलीस आयुक्त कार्यालयातील विविध विभाग, पोलीस महासंचालक कार्यालय
तसेच इतर कार्यालये पात्र उमेदवारांनी पिंजून काढली होती. 10,949 मतदारांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवला.
त्यामुळे या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
उमंग पॅनलने रचला इतिहास
या निवडणुकीत एकूण 73 उमेदवार निवडणूक लढवत होते. त्यापैकी उमंग पॅनलचे 13 पैकी 13
उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत. उमंग पॅनलने सलग दुसर्यांदा विजय मिळवून इतिहास रचला आहे.
उमंग पॅनलचे दादा सलगर यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/australian-killer-whales-destroyed-karanyacha-decision/