विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावीतील संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा
१४८ वा प्रकट दिन सोहळा भक्तांसाठी अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे.
अकोला, गायगाव, निमकर्दा या दिंडी मार्गांवर बुधवारी सकाळपासूनच हजारो भक्तांचा जनसागर लोटला होता.
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग
संतश्रेष्ठांच्या प्रगटदिनाच्या पूर्वसंध्येला पारंपरिक पायदळ वारी काढण्यात आली.
महिला, पुरुष, आबालवृद्ध आणि लहान मुलेही या वारीत मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.
श्रींच्या दर्शनाची आस लागलेल्या भाविकांनी भजन, कीर्तन आणि जयघोषांच्या गजरात
ही वारी आनंदमय वातावरणात पूर्ण केली.
सेवेसाठी समर्पित हात
वारी दरम्यान शेकडो सेवेकरी अहोरात्र वारकऱ्यांच्या सेवेत कार्यरत होते.
भोजन, नाश्ता, दूध, चहा, शीतपेय, फळे आदींचे मोफत वाटप विविध
सामाजिक संस्था आणि तरुण मंडळांकडून करण्यात आले.
सुरक्षा व वैद्यकीय सुविधा
भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तसेच, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय चमू आणि रुग्णवाहिका वारी मार्गावर तैनात होत्या.
५० किमीचा पवित्र प्रवास
डाबकी रेल्वे गेटवरून गायगाव, निमकर्दा, अडोशी, कडोशी, कसूरा आणि नागझरी
हा जवळपास ५० किमीचा प्रवास भक्तांनी मोठ्या श्रद्धेने पूर्ण केला.
अखेरीस, शेगावच्या पवित्र भूमीत पोहोचून भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला.
या सोहळ्याने श्रद्धा, सेवा आणि भक्ती यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
Click here for more updates :https://ajinkyabharat.com/vasundhara-english-hyculmadhye-shivjayanti-enthusia/