मुंबईतील अंधेरीत एका ५१ वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेशी लग्न
करून तिचे दागिने चोरण्याची घटना घडली. प्रमोद नाईक नावाच्या या
आरोपीने पुण्यातील एका सोन्याच्या कंपनीला दागिने विकण्याचा प्रयत्न केला,
Related News
राज्यात दुष्काळ जाहीर; 265 तालुक्यांचा समावेश, पंकजा मुंडे बांधावर पोहोचल्या; म्हणाल्या, ‘बळीराजाला बळी जाऊ देणार नाही’
राज्यात यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने अनेक भागांमध...
Continue reading
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; तिघांना क्लिनचिट, चार्जशीटमधून नेमकं काय समोर आलं?
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात मोठी अपडेट समोर आल...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न द्या; संजय राऊतांचा भाजपवर खोचक टोला
पश्चिम बंगाल निवडणुका आणि मतदार यादीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या पद्मभूषण मागणीवर राऊतांचा उप...
Continue reading
पेट्रोल पंपांवरील UPI पेमेंटचा ₹5 चार्ज हटणार? पेट्रोलियम मंत्रालयाचं मोठं स्पष्टीकरण; डीलर्सच्या मागणीवर काय म्हणाले?
पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर UPI द्वारे पेमेंट करणाऱ्या ग्...
Continue reading
बँकांना सलग पाच दिवस सुट्टी; सॅलरी कधी जमा होणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Bank Holiday : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बँक कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावित तीन दिवसांच्या संपामुळे बँक...
Continue reading
Donald Trump : ट्रम्प यांची मोठी घोषणा; होर्मुजच्या सामुद्रधुनीला ‘ट्रम्प स्ट्रेट’ नाव देण्याची चर्चा, इराणच्या 7 दिवसांच्या प्रस्तावाने वाढली जगाची चिंता
अमेरिका-इराण संघर्षाच्या...
Continue reading
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; वाशिममध्ये नेमकं काय म्हणाले?
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणव...
Continue reading
ज्ञानेश कुमारांमुळेच शिंदे-अजितदादा निवडणूक जिंकले; संजय राऊतांचा गंभीर आरोप, महाराष्ट्रातील निवडणूक रद्द करण्याची मागणी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरून देश...
Continue reading
सणासुदीत खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता; केंद्र सरकारकडून आयात शुल्कात मोठी कपात
कच्च्या सोयाबीन आणि पामतेलावरील शुल्क १० टक्क्यांवरून ५ टक्के; कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल...
Continue reading
Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किंमतीत किंचित घट; पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत बुधवारी झालेल्या...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांचा ‘खापर पणजोबा’ कुठून आला? फॉर्म-६च्या वादावर संजय राऊत आक्रमक; महाभियोग आणण्याची घोषणा निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेद आणि मतदार यादीच्या व...
Continue reading
Rohit Pawar चा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; ‘भाकरी पिकवणारा शेतकरी आता शेतात बॉम्बही पिकवायला लागला का?’
दुष्काळी पाहणी दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेवरून Rohit Pawarची टीका; शेतकऱ्यांना ...
Continue reading
पण पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली.गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील
गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
त्यातच आता मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
मुंबईतील अंधेरी परिसरात एका विधवा महिलेशी लग्न करुन तिचे दागिने
घेऊन पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
प्रमोद नाईक (51) असे या आरोपीचे नाव आहे.
दिंडोशी पोलिसांनी घटना घडल्यानंतर 15 दिवसांनी पुण्यातून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद नाईक विधवा महिलेशी लग्न करुन मुंबईहून पळ काढला होता.
त्याने तिचे सोन्याचे दागिने चोरले होते. यानंतर त्याने चोरीचे सोन्याचे दागिने पुण्यातील एका
सोन्याच्या कर्ज कंपनीला विकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला त्याची अपेक्षित किंमत मिळाली नाही.
त्यामुळे तो दुसऱ्या खरेदीदाराचा शोध घेत होता. यादरम्यान पोलीस हे आरोपीचा शोध घेत होते.
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम जप्त
पोलीस तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की आरोपी पुण्यातील बाणेर परिसरात आहे.
तिथून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी अंदाजे २९.५ तोळे सोने, १.५ किलो चांदीचे
दागिने आणि काही रोख रक्कम जप्त केली. प्रमोद नाईकने हा सर्व मुद्देमाल त्याच्या
दुसऱ्या पत्नीच्या मालाड येथील घरातून चोरला होता.
प्रमोदने त्यांच्या दुसऱ्या पत्नीला सांगितले होते की त्याची पहिली पत्नी आणि दोन
मुले यांचा कोविडदरम्यान मृत्यू झाला. मात्र प्रत्यक्षात ते अजूनही जिवंत आहेत आणि मुंबईतील गिरगाव येथे राहतात.
लवकरच त्यांचा घटस्फोट होणार आहे.
…अन् पोलिसांनी मुसक्या आवळल्या
प्रमोद नाईकवर मालाडमधील एका इव्हेंट कंपनीत काम करत होता.
या ठिकाणी त्याने फसवणूक केली होती. त्याने त्याच्या खात्यात २५ लाख रुपये
फसवणूक करुन ट्रान्सफर करुन घेतले होते, असा आरोप त्याच्यावर होता.
तपासादरम्यान असे आढळून आले की प्रमोद नाईक ४५-५५ वयोगटातील
विधवांची मॅट्रिमोनियल साइट्सवरुन माहिती काढायचा.
लग्नाच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करायचा. गेल्या महिन्यात एका ५०
वर्षीय महिलेला त्याने फसवले होते. प्रमोद नाईक चार ते पाच
महिलांच्या संपर्कात होता आणि त्यांच्याशी लग्न करून त्यांना अशाच प्रकारे
फसवण्याचा त्याचा हेतू होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/legislative-assembly/