दिल्लीतील अनेक भागांमध्ये लोक घाबरून घराबाहेर, इमारतींखाली रस्त्यावर उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यामुळे दिल्लीत भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
देशाची राजधानी नवी दिल्ली आणि एनसीआर परिसराला आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला.
Related News
तुमच्या आधार कार्डवर दुसऱ्याने सिमकार्ड घेतलंय का? घरबसल्या तपासा; अनोळखी नंबर आढळल्यास करा ही कारवाई
आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे प्रत्येक ना...
Continue reading
सात दिवस, सात फळं! सफरचंदापासून किवीपर्यंत; आठवड्याभरात कोणत्या दिवशी कोणतं फळ खावं?
Healthy Tips : सध्याची धावपळीची जीवनशैली, अनियमित आहार आणि व...
Continue reading
KBC होस्ट करणं सोपं नाही; अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली मनातील खळबळ
बॉलिवूडचे महानायक आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून
Continue reading
EPFO Enrolment Campaign 2026 : नोकरीला 17 वर्षे पूर्ण झाली? मग ही संधी सोडू नका; PF सोबत पेन्शन आणि विम्याचाही लाभ
EPFO Enrolment Cam...
Continue reading
जनधन योजनेबाबत धक्कादायक माहिती; 5.72 कोटी खात्यांमध्ये शून्य शिल्लक
प्रत्येक चौथ्या जनधन खात्यापैकी एक खाते निष्क्रिय; आरटीआयमधून समोर आली आकडेवारी, महाराष्ट्रातील 36.04 लाख खात्...
Continue reading
Pakistan सौदीच्या मदतीला युद्धात उतरणार? मक्का करारामुळे मध्यपूर्वेत नवा तणाव
Pakistan Mecca Pact : मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमी...
Continue reading
DJ मुळे मंत्र्यालाच ऐकू येणे कमी; गुलाबराव पाटलांचा धक्कादायक अनुभव, गणेशोत्सवात डीजे न वाजवण्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात डीजेच्या मोठ्या आवाजाचा मुद्दा पुन्...
Continue reading
इंजिनिअर हरले, तंत्रज्ञानही फेल! 170 वर्षे जुनी खडे हनुमानाची मूर्ती एक इंचही हलली नाही; उज्जैनमध्ये नेमकं काय घडलं?
सिंहस्थ महाकुंभ 2028
Continue reading
Sugar Rate : साखरेच्या दरात मोठी घसरण; केंद्राच्या १० लाख टन आयात निर्णयासमोर नवा पेच
देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम आता केंद्र सरकारच्या साखर आय...
Continue reading
मनुस्मृतीचं दहन, जोरदार घोषणाबाजी; युवक काँग्रेसची संघ कार्यालयावर धडक, नागपुरात वातावरण तापलं
मनुस्मृतीचं दहन, घोषणांनी न...
Continue reading
“तुम्ही आडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर...” Manoj Jarange Patil चा निर्वाणीचा इशारा; अंतरवालीत वातावरण तापलं
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला असून, मराठा ...
Continue reading
दारू-सिगारेटपेक्षाही धोकादायक ठरू शकते ही गोष्ट; तज्ज्ञांचा इशारा, हळूहळू आरोग्यावर होतो गंभीर परिणाम
आरोग्य विशेष | एकटेपणाचा शरीर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्य...
Continue reading
सोमवारी पहाटे 5 वाजून 36 मिनिटांनी नवी दिल्लीत भूकंपाचे हादरे बसले आहेत.
या भूकंपाची तीव्रता 4.3 रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.
यामुळे दिल्लीतील जनता साखर झोपेत असताना अनेकजण खडबडून जागे झाले.
यामुळे दिल्लीकरांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत पहाटे ५.३६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.
याचे केंद्र दिल्लीच्या जवळच जमिनीपासून ५ किलोमीटर खोलीवर होते.
हा भूकंप दिल्ली-एनसीआरमध्ये २८.५९ उत्तर अक्षांश, ७७.१६ पूर्व रेखांश, ५ किमी खोलीवर झाला.
तात्काळ घराबाहेर पडण्यास सुरुवात
दिल्लीत अचानक झालेल्या या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पहाटे साखरझोपेत असताना अचानक जमीन हलत असल्याचे जाणवण्यास सुरुवात झाली.
यानंतर दिल्लीकरांनी खबरदारी म्हणून तात्काळ घराबाहेर पडण्यास सुरुवात केली.
दिल्ली-एनसीआरसह शेजारील राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
सुदैवाने या भूकंपामुळे कुठेही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.
कोणतीही जीवितहानी नाही
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र दुर्गाबाई देशमुख विशेष शिक्षण महाविद्यालयाजवळील धौला कुआं या ठिकाणी होते.
पहाटे ५:३६ वाजता झालेला हा भूकंप पाच किलोमीटर खोलीवर होता.
सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दर 2 ते 3 वर्षांनी भूकंप
नवी दिल्लीतील हा भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या भागाजवळ एक तलाव आहे.
या ठिकाणी दर दोन ते तीन वर्षांनी भूकंप होतात. एका अधिकाऱ्याने सांगितले की, २०१५ मध्येही या भागात ३.३ तीव्रतेचा भूकंप झाला होता.
या भूकंपामुळे दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमधील अनेक उंच इमारतीमधील लोक घराबाहेर पडले.
दिल्ली पोलिसांनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
आम्हाला आशा आहे की तुम्ही सर्व सुरक्षित असाल. आपत्कालीन परिस्थितीत ११२ हेल्पलाइनवर कॉल करा, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/me-gabarlo-hoto-mhanoon-raatri-1-vajta-phone-devhayat-sanwala/