MP Sanjay Raut attack on Jyotiraditya Scindia :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील सत्कार सोहळ्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले.
त्याचे पडसाद अजूनही दिल्लीसह राज्यात उमटत आहे. ज्योतिरादित्य शिंदेंना राऊतांनी असे प्रत्युत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील सत्कार सोहळ्याने महाविकास आघाडीलाच नाही तर राज्यातील राजकारणाला हादरे बसले.
दिल्लीचे तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात भूंकप आला. एकनाथ शिंदे यांचा सत्कार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाल्याने उद्धव ठाकरे गटाचा तिळपापड झाला.
त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. शिवसेना फोडणाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याला पवारांनी जायला नको होते, अशी प्रतिक्रिया ठाकरे गोटातून उमटली.
Related News
अकोला (गंगानगर बायपास):
गत १० वर्षांपासून भक्तीमय उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या सालासर बालाजी मंदिरात
यंदा हनुमान जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक १२ एप्रिल...
Continue reading
तेल्हारा (९ एप्रिल २०२५):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ...
Continue reading
अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची "मुंबई-अमरावती-मुंबई" विमानसेवा आता सुरू झाली आहे.
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्...
Continue reading
अकोट (दि. ९ एप्रिल २०२५):
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था, अकोट याच्या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडीत तसलीम ताहेर पटेल
यांची चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या का...
Continue reading
बार्शीटाकळी, जि. अकोला (प्रतिनिधी):
आसरा माता यात्रा,अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील एक प्रसिद्ध धार्मिक उत्सव...या यात्रेदरम्यान,
अनेक भक्त आणि भाविक ...
Continue reading
सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावाती...
Continue reading
अकोला, दि. १० (प्रतिनिधी):
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ एप्रिल रोजी
रात्री एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आ...
Continue reading
मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे ...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि माजी आमदार रामाभाऊ कराळे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना
पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हि...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न शिवनी येथून अकोल्याकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाचे
अचानक नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.
डॉ....
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
अकोट तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांबाबत तक्रारीनंतर चौकशी झाली
आणि ग्रामपंचायत सचिवासह इतर चार व्यक्तींवर उपविभागीय अधिकारी अकोट यांनी द...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
अकोला औद्योगिक वसाहतीतील ए.डी.एम. ऍग्रो कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या
न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाम भूमिका घेत ...
Continue reading
त्यावरून राज्यात खळबळ उडाली. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या. त्यातच आता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मराठा स्वाभिमानावरून
पुन्हा राळ उडवून दिली. आता हे वाकयुद्ध संपणार की नाही, अशी विचारणा होत आहे.
दरम्यान सत्कार सोहळ्यानंतर उद्धव गट आणि शिंदे गटात शाब्दिक फैरी झडल्या. काल दिवसभर राज्यात त्याचे पडसाद उमटले.
तर राष्ट्रवादीतील दोन्ही गटांनी अधूनमधून गोळीबार केला. भाजपाने पण ठाकरे गटावर तोंडसुख घेतले. त्यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पण उद्धव सेनेला खडसावले.
“मराठा समाज सर्व बघतोय. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श बाजूला सारून न केवळ हिंदुत्वाचा नाही तर मराठा स्वाभिमानाचा अपमान करणारे,
मकाय समजतील?”, असा टोला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्वीटमधून हाणला.
महाराज, इतिहास समजून घ्या
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ट्वीटनंतर ठाकरे गट आक्रमक झाला. संजय राऊतांनी सकाळीच ट्वीट करुन त्याला खरमरीत उत्तर दिले.
त्यामुळे हा वाद आजही संपणार नाही असंच दिसत आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनी थोड्यावेळापूर्वी दिल्लीतून जाहीर नाराजी व्यक्त केली.
“महाराज, इतिहास समजून घ्या. ज्योतिरादित्यांनी महाराष्ट्राचा शौर्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. महादजी शिंदे वीर होते.
त्यांनी दिल्लीपुढे कधी लोटांगण घातलं नाही. दिल्लीसमोर महाराष्ट्र कधी झुकवला नाही. हे जरा आताच्या महाराजांनी समजून घेतलं पाहिजे.
एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्याविषयी म्हणणं नाही. कुणाच्या नावाने देताय याला विरोध आहे. तुम्ही महादजी शिंदे यांची प्रतिष्ठा कमी केली आहे.
तुम्ही तुमच्या पूर्वजांची प्रतिष्ठा कमी करत आहात. एका योद्ध्याची प्रतिष्ठा कमी करत आहे. तुम्ही जयाजीराव शिंदे यांच्या नावाने पुरस्कार द्या. आमचं काही म्हणणं नाही
.” असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.
Read more: https://ajinkyabharat.com/chief-minister-koni-basla-mhanje-shahana-tharat-nahi-sanjay-raut-yancha-chief-minister/