अकोला: शेतमालाला योग्य हमीभाव, सरसकट कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या
अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी अकोल्यातील शेतकरी जागर मंचच्या वतीने
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन करण्यात आले.
Related News
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
या आंदोलनात शेतकऱ्यांनी रात्रभर भजन म्हणत सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
- शेतमाल हमीभाव कायदा त्वरित लागू करावा.
- सरसकट कर्जमुक्ती द्यावी.
- सोयाबीन – ₹6,000, हरभरा – ₹8,000, कापूस – ₹10,000, तूर – ₹12,000 प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करावा.
- स्वामिनाथन आयोग लागू करावा.
- पीक कर्जावर (CIBIL) अट लागू करू नये.
- कर्ज परतफेडीचा कालावधी १२ महिने करावा.
- रब्बी व खरीप हंगामासाठी प्रती एकर ₹40,000 अनुदान द्यावे.
- कृषी साहित्यावरील जीएसटी (GST) रद्द करावी.
रात्रभर सुरू राहिले आंदोलन
हे आंदोलन रात्री १० वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होते.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी कीर्तन व भजन गात आपला आवाज बुलंद केला.
मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.
सरकारला इशारा
या आंदोलनामुळे सरकारची झोप उडावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा,
हा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. सरकारने तातडीने
शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/gold-and-silver-sparkle-mahagaichi-tutari/