डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेत सत्तेवर आले आहेत. त्यामुळे जागतिक
राजकारणात अनेक बदल होणार आहेत. अमेरिकेची जागतिक राजकारणात एक महत्त्वाची भूमिका आहे.
आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी कुठल्या देशाचा नेता सर्वात जास्त जवळचा आहे? ते स्पष्ट झालय.
Related News
त्या नेत्याला व्हाइट हाऊसमध्ये येण्याचा मान मिळाला आहे.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू
यांची मैत्री पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात बेंजामिन नेतन्याहू
व्हाइट हाऊसमध्ये जाणारे पहिले परदेशी नेते ठरले आहेत. माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी बेंजामिन
नेतन्याहू यांना 4 फेब्रुवारीला व्हाइट हाऊसमध्ये बोलावलं आहे. व्हाइट हाऊस आणि नेतन्याहू यांच्या कार्यालयाने
बातमी खरी असल्याच सांगितलं आहे.या यात्रेची वेळ खूप खास आहे.
कारण गाझा पट्टीत 15 महिने चाललेल्या विनाशकारी युद्धानंतर युराम विरामाच्या
दुसऱ्या टप्प्याची चर्चा सुरु होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प शपथविधीपासून या युद्ध विरामाच क्रेडिट घेत आहेत.
स्थायी सीजफायर करु नये यासाठी नेतन्याहू सरकारवर इस्रायलमधील दक्षिण पंथीय नेते दबाव टाकत आहेत.
ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्या भेटीमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या युद्ध विरामावर बोलणी होईल.
इस्रायल आणि त्यांच्या शेजाऱ्यांसाठी शांतता स्थापित करणं, समान विरोधकांचा सामना करण्यासाठी
कुठली पावलं उचलायची यावर ट्रम्प यांना चर्चा करायची आहे असं व्हाइट हाऊसने म्हटलय.
ट्रम्प यांच्यासोबतची ही भेट इस्रायली पंतप्रधानांसाठी एक संधी आहे.
कारण इस्रायलच्या अंतर्गत राजकारणात त्यांच्यावर दबाव वाढला आहे.
अमेरिकेकडून समर्थन मिळवून ते मायदेशात सांगू शकतात की, ट्रम्प सोबत त्यांचे चांगले संबंध आहेत.
जास्तीत जास्त मदत ते इस्रायलसाठी आणू शकतात.
इस्रायलला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळते. अमेरिका इस्रायलला शस्त्रास्त्र, पैसा देण्यासह
आंतरराष्ट्रीय मंचावर नेहमीच साथ देतो. ट्रम्प यांच्या भेटी दरम्यान ते इस्रायलसाठी आणखी
मदत आणतील अशी नेतन्याहू यांच्याकडून अपेक्षा आहे.
हमास सुरुवातीपासून गाझा पट्टीतून इस्रायलची पूर्ण माघार आणि स्थायी युद्ध विरामाची मागणी करत आहे.
नेतन्याहू यांनी इशारा दिला आहे की, हमासने दुसऱ्या टप्प्यात युद्ध विरामाच्या अटी मान्य केल्या नाहीत, तर ते पुन्हा युद्धा सुरु करु शकतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/binkhatyachan-minister-kalam-tari-eknath-shinde-minister-sodanar-naheit-sanjay-raut-yancha-tola/