अकोट नगरपरिषदेच्या प्रांगणात असलेली जुनाट आणि जीर्ण अवस्थेत असलेली इमारत कोसळण्याच्या मार्गावर आहे.
पूर्वी या इमारतीत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचे कार्यालय होते आणि याच ठिकाणाहून नगरपरिषदेचा संपूर्ण कार्यभार चालायचा.
परंतु आता ही इमारत शतकभर जुनी असून अत्यंत धोकादायक स्थितीत आहे.
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
या इमारतीच्या दुरवस्थेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये, म्हणून नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे यांनी या इमारतीसंबंधी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
नागरिकांची मागणी आहे की ही इमारत पाडून सुरक्षित पद्धतीने नवी इमारत उभारावी, जेणेकरून कोणतीही हानी होणार नाही.
मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे यांनी अकोट शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
नगरपरिषदेची नवीन इमारत उभारणे, घरकुल योजना, शहरातील मुख्य रस्त्यांची विकासकामे, विद्युत पोल बसवणे,
तसेच शहरातील कचऱ्याचे नियमित व्यवस्थापन अशा विविध प्रकल्पांद्वारे त्यांनी शहराचा कायापालट केला आहे.
त्यांच्या या विकासात्मक दृष्टिकोनामुळे अकोटच्या नागरिकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
आता या जीर्ण इमारतीचा प्रश्नही ते तातडीने सोडवतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/uddhav-thackeray-is-a-true-traitor-raj-thackerays-legislation-has-created-a-stir-in-maharashtra-politics/