अकोला जुने बस स्थानक अस्वच्छतेच्या विळख्यात, प्रवाशांची गैरसोय वाढली

अकोला जुने बस स्थानक अस्वच्छतेच्या विळख्यात, प्रवाशांची गैरसोय वाढली

अकोल्यातील जुने बस स्थानक सध्या अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले असून प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरले आहे. या बस स्थानकावर आवाज भिंतीचा अभाव असल्याने अतिक्रमण वाढले आहे.

स्थानकाच्या शेजारील बाजारपेठेतील व्यापारी मोठ्या प्रमाणावर कचरा या ठिकाणी फेकत असल्याने कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत.

स्थानकाचा परिसर अत्यंत अस्वच्छ असून प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या जागेवरही स्वच्छतेचा अभाव आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Related News

अशा परिस्थितीत जिल्हा वाहतूक विभाग आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे परिवहन मंडळाद्वारे नियमित स्वच्छता स्पर्धांचे आयोजन केले जाते,

मात्र अकोल्याचे जुने बस स्थानक कधी स्वच्छ होणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन बस स्थानकाची स्वच्छता व व्यवस्थापन सुधारावे, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिक करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/vinod-kambli-birthday-today-is-a-special-birthday-for-kambli-who-is-struggling-and-never-forgets-his-work/

Related News