बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याबाबत तपास सुरू आहे. पोलिसांनी करिना कपूर-खान हिचा जबाब नोंदवला आहे,
ज्यामध्ये तिने हल्लेखोराने चाकूचा धाक दाखवून एक कोटी रुपयांची मागणी केल्याचे सांगितले आहे. करिनाच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराने घरातील मौल्यवान दागिन्यांना हात लावला नाही.
तपासादरम्यान, पोलिसांनी सैफ अली खानच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. हल्लेखोराने हल्ल्यानंतर कपडे बदलून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केल्याचे आढळले आहे.
Related News
माय ममता झाली काळी!
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
पोलिसांनी सुमारे ५० लोकांची चौकशी केली असून, आरोपीच्या मागे मोठी टोळी असण्याची शक्यता तपासली जात आहे. सैफ अली खानवर चाकूने सहा वार करण्यात आले होते, ज्यामुळे त्यांच्या मानेवर,
पाठीवर आणि हातावर जखमा झाल्या. त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अभिनेता शाहिद कपूरने सैफ अली खानवरील हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
सुरक्षा उपाययोजनांबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also :https://ajinkyabharat.com/the-words-you-use-praful-patel-launches-important-statement-regarding-chhagan-bhujbal/