विशेष ग्रामसभेद्वारे गावोगाव देणार स्पर्श मोहिमेबाबत माहिती जि. प. सीईओ बी. वैष्णवी

विशेष ग्रामसभेद्वारे गावोगाव देणार स्पर्श मोहिमेबाबत माहिती जि. प. सीईओ बी. वैष्णवी

अकोला, दि. 16: स्पर्श कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेबाबत गावोगाव जनजागृती करण्यासाठी दि. 26 जानेवारी रोजी ग्रामसभांमध्ये माहिती देण्यात येईल. या मोहिमेचा मुख्य उद्देश जनजागृतीद्वारे कुष्ठरोगाचे लवकर निदान आणि उपचार याचे महत्त्व

समाजापर्यंत पोहोचवणे हा आहे. दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान, विविध आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबविले जातील.

26 जानेवारी रोजी ग्रामसभा: जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा संदेश वाचन. कुष्ठरोग निर्मूलन प्रतिज्ञा घेतली जाईल.

ग्रामपातळीवर जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातील. निबंध स्पर्धा, रांगोळी, आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन.

विद्यार्थ्यांना कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रेरित करणे. गरजूंना तातडीने तपासणी व उपचारांची सुविधा. अधिकाधिक नागरिकांचा सहभाग मिळवण्यासाठी विशेष प्रसिद्धी मोहिम राबविली जाईल.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी सर्व विभागांनी एकत्रित समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. सीईओंच्या दालनात झालेल्या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, ग्रामविकास

अधिकारी आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कुष्ठरोग निर्मूलन दिन साजरा करण्यात येईल.

लवकर निदान व उपचाराचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवले जावे.” सध्या अकोला जिल्ह्यात 130 कुष्ठरुग्ण उपचाराखाली आहेत. सातत्याने तपासणी आणि उपचार कार्यवाही केल्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आहे.

सहायक संचालक आरोग्य सेवा डॉ. दिलीप रणमले यांनी याबाबत माहिती दिली. जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन समाजाला कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/where-is-the-safe-nature-right-now-request-issued-by-lilavati-what-is-the-name-of-it/