अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील देगाव येथे श्री संत शंकर महाराज पुण्यतिथी

अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील देगाव येथे श्री संत शंकर महाराज पुण्यतिथी

अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील देगाव येथे श्री संत शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त यात्रा महोत्सवाचे

आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी तब्बल २५ क्विंटल ज्वारीच्या भाकरींच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले,

ज्यामध्ये हजारो भाविक भक्तांनी सहभाग घेतला. गेल्या ४६ वर्षांपासून देगाव येथे हा वार्षिक यात्रा महोत्सव आयोजित केला जातो.

Related News

आसपासच्या गावांमधील भाविक या यात्रेसाठी आवर्जून उपस्थित राहतात. या महोत्सवात मोठ्या प्रमाणावर भंडारा, महाप्रसाद आणि विविध

धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आज समारोप झाला.

यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली, ज्यामुळे भाविकांमध्ये उत्साह आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

Related News