अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आज (२० जून) नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर आंबेडकरी समाजाच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले. शासनाने समाजाची मागणी नसताना समिती स्थापन करून कोणताही जाहीर अहवाल किंवा व्यापक चर्चा न करता उपवर्गीकरण लागू करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या निर्णयामुळे अनुसूचित जातींच्या संवैधानिक अधिकारांवर परिणाम होणार असल्याचा दावा करत आंदोलनकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी केली.
या आंदोलनात नागपूरसह यवतमाळ आणि राज्यातील विविध भागांतून आलेले शेकडो आंबेडकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाने उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. संविधानाने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी हा लढा असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. शासनाने समाजाच्या भावना लक्षात घेऊन निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आंदोलन शांततेत पार पडले असून पुढील भूमिका लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
read also : https://ajinkyabharat.com/category/entertainment/page/2/
