नगर परिषद अध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी उईके यांच्याशी झालेल्या चर्चेचा अर्धवट व्हिडिओ प्रसारित करणे चुकीचे – भाजपाचे गटनेते नितीन गिरी

नगर परिषद

शहरातील अतिक्रमण कारवाईसंदर्भात काँग्रेसच्या काही नेत्यांनी यवतमाळ नगर परिषदेत जाऊन नगर परिषद अध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी बिनाअशोक उईके यांची भेट घेत निवेदन सादर केले. यानंतर सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या अर्धवट व्हिडिओबाबत भाजपाचे गटनेते नितीन गिरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नितीन गिरी म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, चर्चेचा संपूर्ण संदर्भ न दाखवता केवळ निवडक भाग सोशल मीडियावर प्रसारित करणे योग्य नाही. अशा कृतीमुळे जनतेमध्ये गैरसमज निर्माण होतात आणि वस्तुस्थितीपेक्षा वेगळे चित्र उभे राहते.

नगर परिषद अध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी उईके यांनी संयमाने सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर झालेल्या चर्चेचा केवळ काही भाग दाखवून राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागणे अपेक्षित असून जनतेची दिशाभूल होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

शहराच्या विकासासाठी आणि जनहिताच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होणे गरजेचे आहे. अर्धवट व्हिडिओ प्रसारित करून प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विधायक भूमिका घेणे अधिक महत्त्वाचे आहे, असे मत भाजपाचे गटनेते नितीन गिरी यांनी व्यक्त केले.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/inspirational-marriage-of-2-surrendered-maoists-gondiat/