एसटी कर्मचाऱ्यांचा पगार यंदा दिवाळीच्या आधी त्यांच्या बॅंकच्या
खात्यात जमा होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन
महामंडळाला सप्टेंबर 2024 च्या सवलत मुल्यांच्या प्रतिपूर्ती
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
पोटी 350 कोटी रुपये रोखीने प्रदान करण्यास मान्यता मिळाली
आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच सप्टेंबर
महिन्याचा पगार त्यांचा खात्यावर जमा होणार आहे. एरव्ही एसटी
कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 7 ते 10 तारखांना त्यांच्या
खात्यावर जमा होत असतो. परंतू यंदा विशेष बाब म्हणून
दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पगार दिवाळीच्या आधीच एसटी
कामगारांच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग
परिवहन मंडळाने सप्टेंबर 2024 च्या महिन्यासाठी
सवलतमूल्याची रक्कम म्हणून 350 कोटी रुपये देण्याची मागणी
राज्य सरकारकडे केली होती. महामंडळाच्या उपाध्यक्ष आणि
व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने सरकारने
या विनंतीला मंजूरी दिली आहे. राज्य सरकारने एसटी
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी 350 कोटी रुपयांच्या निधीला
मंजूरी दिली आहे. आणि दिवाळी पूर्वी ही रक्कम एसटी
महामंडळास वितरित करण्याचे नियोजन केले आहे. या निधीमुळे
एसटी कर्मचाऱ्यांना वेतन दिवाळीच्या आधी मिळणे शक्य होणार
आहे. 28 ऑक्टोबर पासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होत
आहे. महानगर पालिका आणि अन्य कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस
मिळाला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देखील
बोनस मिळावा अशी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस
श्रीरंग बरगे यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी 55
कोटींचा निधी तातडीने द्या, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार की नाही हा प्रश्न अनुत्तरित
असला तरी दिवाळी आधी त्यांचा पगार मात्र त्यांच्या खात्यावर
जमा होणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/15-thousand-hectare-pikanchi-nasadi-in-buldhana-district/