गोंदियातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचे अजित पवारांच्या
राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना डावलून, भाजपचे
माजी मंत्री राजकुमार बडोले यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
दिली. त्यानंतर मनोहर चंद्रिकापुरे यांनी बच्चू कडूंच्या तिसऱ्या
आघाडीत प्रवेश करत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला
आहे. अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला
असा आरोप आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला. मनोहर
चंद्रिकापुरे म्हणाले, माझ्या मुलाला मी निवडणुकीच्या रिंगणात
उतरवणार आहे आणि त्याच्या पाठीशी उभा असेल.. अजित
दादांनी मला अंधारात ठेवून माझा केसाने गळा कापला… जर
दादांनी मला म्हटलं असतं चंद्रिकापुरे तुमचा परफॉर्मन्स बरोबर
नाही. बडोले तुमच्यापेक्षा समोर आहेत तर मीच तिकिट देऊ नका
असं म्हटलं असतं. माझ्या पाठीत खंजीर खुपसल्याचा जयंत
पाटील यांना देखील खूप दुःख झालं. पण वाटाघाटी झाल्यामुळे
आम्ही काहीच करू शकणार नाही असे ते म्हणाले.
आशीर्वाद देणारे हात जर पाठीत खंजीर खुपसणार असतील तर
त्या वेदना असह्य होतात. प्रफुल पटेल साहेब जर तुम्हाला आम्हाला
मारायचेच होतं तर पाणी प्यायला थोडी उसंत द्यायला पाहिजे
होती. किती क्रूरपणे निर्णय घेतला आणि एका निष्पाप माणसाच्या
बळी घेतला याचा बदला जनता घेईल. फितूर आणि विश्वासघाती
लोकांना या मतदारसंघातील नागरिक धडा शिकवतील, असे
मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/dana-chakrivaadlacha-dhumakuol/