शेअर बाजाराने मंगळवारी गुंतवणुकदारांना चांगलाच झटका दिला.
सेन्सेक्स आणि निफ्टी फिफ्टी हे दोन्ही निर्देशांक मंगळवारी
गडगडले. सेन्सेक्सवर नोंदणीकृत जवळपास ५० टक्के कंपन्यांचे
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
शेअर्स गडगडल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. आज मार्केट
बंद होताना निफ्टी फिफ्टी २४,४७२.१० अंकावर म्हणजेच १.२५
टक्केंनी खाली आला होता. तर सेन्सेक्स ८०२२०.७२ अंकावर
म्हणजे १.३० टक्केंनी खाली आला. आज दिवसभरात
गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटींचे नुकसान झाले.
टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, टाटा मोटर्स, एसबीआय, इंडसइंड
बँक या कंपन्याचे शेअर्स घसरले. तर दुसरीकडे अल्ट्राटेक सिमेंट,
टायटन, इन्फोसिस, आयसीआयसीआय आणि पॉवर ग्रिड कॉर्प या
कंपन्यांकडून मात्र गुंतवणुकदारांना दिलासा मिळाला. निफ्टी
फिफ्टी या निर्देशांकातील ५० पैकी २८ कंपन्यांचे शेअर्स घसरल्याचे
चित्र आज पाहायला मिळाले. एसबीआय लाईफ, एचडीएफसी
लाईफ, श्रीराम फायनान्स, कोटक महिंद्रा, बेल या महत्त्वाच्या
कंपन्याच्या शेअर्सनी गुंतवणुकादारांची चांगलीच निराशा केली.
स्मॉल कॅप कंपन्यातील शेअर्सची गेली दोन दिवस मोठी विक्री
दिसून येत आहे. स्मॉल कॅप कंपन्यांनी तिमाहीती फारशी
समाधानकारक कामगिरी केली नसल्याने गुंतवणुकदारांनी या
कंपन्यांचे शेअर्स विक्री केल्याचे चित्र दिसले. त्यामुळे आजच्या
इंट्राडे ट्रेडमध्ये निफ्टी स्मॉल कॅप १०० हा निर्देशांका ३.५ टक्केंनी
खाली आल्याचे पाहायला मिळाले. मागील ४ सत्रात हा निर्देशांक
६ टक्केंनी कमी आलेला आहे.
Read also:https://ajinkyabharat.com/ajit-pawars-first-memory-of-gattachi-revealed/