मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमुळे बँकांमध्ये
तुफान गर्दी होत आहे. यामुळे बँक कर्मचाऱ्यांना काम करताना
असुरक्षित आणि भितीचे वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
कामाच्या ठिकाणी सरकारकडून पुरेशी सुरक्षा मिळावी या
मागणीसाठी महाराष्ट्रातील बँक कर्मचारी १६ नोव्हेंबरला संपावर
जाणार आहेत, अशी माहिती बँक कर्मचारी संघटनेने दिल्याचे दिले
आहे. या योजनेमुळे बँकांमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत
आहे. दरम्यान मारामारीच्या हिंसक घटना देखील घडत आहेत.
बँकांमध्ये काम करणे असुरक्षित झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या
सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे राज्यातील बँक कर्मचारी
शनिवार दि.१६ नोव्हेंबर रोजी संपावर जाणार आहेत. युनायटेड
फोरम ऑफ बँक युनियन्सने हा संप पुकारला आहे. ही नऊ बँक
युनियनची संघटना असल्याचेही वृत्तात म्हटले आहे. राज्याच्या
विविध भागात योजनेचे लाभार्थी आणि स्थानिक नेत्यांकडून बँक
कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन, शिवीगाळ आणि मारहाणीच्या घटना
घडल्या आहेत. त्यामुळेच आम्ही एकदिवसीय संपावर जाण्याचा
निर्णय घेतला आहे. योजनेच्या योग्य अंमलबजावणीसाठी
सरकारने बँकांना पुरेशी सुरक्षा आणि अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध
करून द्यावेत, अशी मागणीही यूएफबीयूचे राज्य संयोजक देविदास
तुळजापूरकर यांनी दिली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/sea-whistle-uppower-code-of-conduct-breached-667-complaints/