CBI ची कारवाई
आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्यावर खोटारडेपणा
आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केल्याचे
Related News
अजिंक्य भारत प्रतिनिधी | जानोरीमेळ
निंबा अंदुरा सर्कलमधील गजबजलेल्या मोखा गावात जानोरीमेळ गट ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार कारभाराचा प्रत्यय
सध्या ग्रामस्थांना येत आहे. ऑक्टोबर २०२४...
Continue reading
वणीसह परिसरात दि. 18 ला 5 वाजताच्या दरम्यान पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी
लावली त्यात शहर तसेच परिसरात मोठे नुकसान झाले असून अनेकांचे घराचे टिनपत्रे, वॉटर टँक, झाडे,
कं...
Continue reading
अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या दहीगाव येथील घटनेत हिंदू समाज बांधवांवर
खोटे व चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ आज तेल्हारा बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले ह...
Continue reading
अलीगढ (उत्तर प्रदेश) :
अलीगढ शहरातील अतरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 'ख्वाजा' नावाच्या हॉटेलमध्ये एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.
येथे जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना देवी-दे...
Continue reading
नवी दिल्ली : तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा 2025
मध्ये सुरू होणार आहे. भारत आणि चीनमधील द्विपक्षीय तणाव कमी झाल्यानंतर ही ऐतिहासिक यात्रा
पुन्हा ...
Continue reading
आई-पुत्राने मिळून फरशीच्या तुकड्याने केलं हत्येचं भयावह कृत्य
पुणे – चंदननगर परिसरात गुरुवारी रात्री एका तरुणाचा फरशीच्या तुकड्याने वार
करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....
Continue reading
हायवे लगत झाडांना आग लावून पाडण्याचे कटकारस्थान; वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे वाढत आहे धाडस
पातूर (ता.१८ एप्रिल): शहर व परिसरातील झाडे तोडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून
आता ‘...
Continue reading
अकोला –
ख्रिश्चन धर्मातील अत्यंत पवित्र आणि दु:खद दिवस मानला जाणारा गुड फ्रायडे अकोला
शहरात भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
येशू ख्रिस्तांना क्रूसावर चढवण्यापूर्वी ज्या यातना देण...
Continue reading
जालना: एका महिन्याच्या चिमुरड्या मुलीला विहिरीत फेकणाऱ्या आई-वडिलांना अटक
जालना जिल्ह्यातील चंदनझिरा येथे माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
अवघ्या एका महिन्या...
Continue reading
उत्तराखंडातील ऋषिकेशमध्ये राफ्टिंगदरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली असून,
एका युवकाचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत अ...
Continue reading
आज जय श्री राम ग्रुप ने परस गौ रक्षण केंद्र में गौसेवा का एक सराहनीय कार्य किया।
ग्रुप के सदस्यों ने मिलकर गौमाताओं को गर्मी से राहत देने हेतु 500 किलो तरबूज खिलाए।
गर्मी के ...
Continue reading
अकोला:
शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
शहरातील आठ प्रार्थनास्थळांमध्ये ...
Continue reading
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) म्हटलं आहे. हे प्रकरण १२००
कोटींच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीत बनावट कागदपत्रे आणि
सदोष कागदपत्रांच्या घटनांशी संबंधित आहे. एएनआएने दिलेल्या
वृत्तानुसार, आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाकेंविरुद्ध भारतीय
दंड संहितेच्या कलम १२०-बी, ४६६, ४७४ आणि २०१ अन्वये गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. जळगावमधील बीएचआर राज्य सहकारी
पथसंस्थेच्या घोटाळा प्रकरणाच्या तपासात अनियमितता असल्याच्या
आरोपावरून आयपीएस भाग्यश्री नवटके यांच्याविरुद्ध सीबीआयने
गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलीस दलात आर्थिक गुन्हे विभागाच्या
उपायुक्त असताना भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्यीय पतसंस्थेतील
घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान भाग्यश्री नवटके यांनी तपासात जाणून
बुजून त्रुटी ठेवल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांत गुन्हा दाखल झाला
होता. त्यानंतर हा गुन्हा आता सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आला
आहे. २०२० ते २०२२ या कालावधीत झालेल्या १२०० कोटी रुपयांच्या
घोटाळ्याच्या तपासादरम्यान नवटके यांच्यावर फसवणूक केल्याचा
आरोप आहे. सीआयडीच्या अहवालाच्या आधारे पुणे पोलिसांनी भाग्यश्री
नवटके विरुद्ध ऑगस्टमध्ये पहिला गुन्हा दाखल केला होता. या
अहवालामुळे घोटाळ्याच्या तपासातील गंभीर त्रुटी समोर आल्या.
महाराष्ट्राच्या गृहविभागाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात
आला होता. त्यानंतर हे प्रकरणी सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं.
केंद्र सरकारच्या सहकार खात्याने २०१५ मध्ये भाईचंद हिराचंद रायसोनी
या बहुराज्यीय पतसंस्थेला दिवाळखोर घोषित केले. त्यामुळे पतसंस्थेवर
जितेंद्र कंदारे याची नियुक्ती केली. मात्र कंदारे याने फिक्स डिपॉझिटवर
आकर्षक व्याजाचं आश्वासन देण्यात आलं होतं. यानंतर बँकेकडून
ग्राहकांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी डेक्कन पोलीस
ठाण्यात दाखल झाला होता. भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या कथित
घोटाळ्याशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या
पोलिस उपायुक्त नवटके यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र एका
दिवसात एकाच गुन्ह्यांतर्गत तीन गुन्ह्यांची नोंद करणे आणि त्यांच्या उपस्थिती
शिवाय तक्रारदारांच्या सह्या घेणे अशा खोट्या घटनांमध्ये नवटके यांचा
सहभाग असल्याचे सीआयडी तपासात उघड झाले होते. सीआयडीच्या
अहवालानंतर महाराष्ट्राच्या गृह विभागाने पुणे पोलिसांना गुन्हा दाखल
करण्याचे निर्देश दिले होते.
Read also: https://ajinkyabharat.com/live-railway-service-started-for-akola-route-bihar/