अकोला विभागात धावणाऱ्या ३५ बसेस टाकल्या भंगारात

आता २९५ बसेसच्या भरोश्यावर ९ आगारांचा कारभार

राज्यातील ग्रामीण भागातील जनतेची लालपरी असलेली एस टी

ची अकोला विभाग नियंत्रक कार्यालयाअंतर्गत धावणाऱ्या बसेस

Related News

ची दयनीय अवस्था झालेली आहे. विभागाकडे असलेल्या जेमतेमं

३२० गाड्यांपैकी अनेक गाड्यांनी त्यांचे ठरवलेले आयुष्यमान

ओलांडलेले आहे. त्यामुळे अनेक गाड्या रस्त्यातच ब्रेक डाऊन होत

आहेत. त्यातच गेल्या १० वर्षेपासून विभागाने मध्यवर्ती

कार्यालयाकडे विविध मॉडेल्स च्या नवीन गाड्या मिळाव्यात

म्हणून मागणी केलेली असूनही केवळ आश्वासन मिळत

आहेत. मात्र बसेस पूरवंल्या जात नाहीत. त्यामुळे भंगार झालेल्या

बसेस रस्त्यावर प्रवाशी घेऊन धावत आहेत. एसटी बसेसचे

आयुर्मान केवळ १५ वर्षांसाठी असते. त्यानंतर मात्र चालवण्यास

प्रतिबंधित आहेत. त्यानंतर त्याचे आयुष्य संपते आणि अशा बस

भंगार म्हणून बाहेर काढले जाते. तसे अकोला विभागात ३५

बसेसने वयोमर्यादा गाठली असून त्यांना भंगारात टाकण्यात आले

आहे. या संदर्भात कोणत्या विभागाच्या किती बसेस भंगारात

घ्यायच्या याचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेतला जातो. ही सर्व

प्रक्रिया दरवर्षीप्रमाणे यंदाही केंद्रीय स्तरावर ऑनलाइन आयोजित

करण्यात आली आहे तसेच अकोला विभागाच्या बसेस स्क्रैप

केल्याची माहिती अकोला एसटी विभागांतर्गत कार्यशाळेतून प्राप्त

झाली आहे. एसटी बसेसच्या दैनंदिन कामकाजाची दुरवस्था झाली

आहे. अशा बसेस मार्गात कुठेतरी अडकून पडतील, या भीतीपोटी

आठ ते नऊ वर्षांनी त्या बसेसचे नूतनीकरण करून त्यांचे जास्त

नुकसान होण्याआधी म्हणजेच जे पार्ट खराब झालेले आहेत ते

दुरुस्त केले जातात. या प्रमाणे नंतर या मार्गावर बसेस चालवल्या

जातात. या मार्गावर बस चालवण्याची वयोमर्यादा १५ वर्षे नमूद

करण्यात आली आहे. प्रत्येक बस १५ वर्षांनंतर रद्दीत बदलते.

दरवर्षी १० ते २० बसेसचे भंगारात रूपांतर होते. मात्र ही प्रक्रिया

गतवर्षी रखडल्याने ऑक्टोबर २०२४ मध्ये दोन वर्षानंतर सुमारे ३५

बसेस पूर्णपणे रद्द झाल्या आहेत. अकोला विभागात सुमारे ९ डेपो

आहेत. त्यात अकोला आगार क्र. १, अकोला आगार क्र.२ अकोट,

कारंजा, मंगरूळपीर, वाशिम, रिसोड, तेल्हारा, मूर्तिजापूरचा

समावेश आहे. अकोला विभाग नियंत्रक कार्यालयातर्गत या

मार्गावर फक्त २९५ बसेस धावणार आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/sadgurunchya-isha-foundation-ashramatoon-lok-missing/

Related News