बीसीजी लसीकरण अभियान: नऊ हजाराच्या वर लाभार्थ्यांची नोंद

क्षयरोगापासून बचाव होण्यासाठी बीसीजी लस जन्मतः सर्व लहान

मुलांना देण्यात येते. त्यामुळे लहान मुलांचा गंभीर प्रकारच्या

क्षयरोगापासून बचाव होतो. सद्यः स्थितीत प्रौढांमध्ये होणाऱ्या

क्षयरोग प्रतिबंधासाठी बीसीजी लसीचा वापर होत आहे. त्या

अनुषंगाने महापालिका क्षेत्रातही वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत

प्रौढांना बीसीजी लस देण्यात येत असल्याची माहिती

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

अकोला महापालिका वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने बीसीजी

लसीकरण अभियानाची सुरुवात माहे एप्रिल २०२४ पासून सुरू

करण्यात आली आहे.  आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत घरोघरी

जाऊन सर्वेक्षण करण्यात आले, एकूण लोकसंख्या ५३३०००,

लोकसंख्येचे सर्वेक्षण झाले असून त्यामधून पात्र आणि इच्छुक

असे ९८०८ व्यक्तींची नोंद वर करण्यात आली आहे. प्रत्यक्षात

लस देण्याकरिता महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या सर्वच नागरी

आरोग्यकेंद्रामार्फत ३ सप्टेंबर २०२४ पासून लसीकरण मोहिमेची

सुरुवात करण्यात आली असून, १६ ऑक्टोंबर पर्यंत १८२ सत्र

झाले असून, एकूण १९२१ लाभार्थ्यांनी बीसीजी लस घेतली आहे.

हे अभियान पुढील दोन महिन्यापर्यंत सुरू असून सर्व पात्र

लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. अनुप चौधरी

वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा अकोला, डॉ. निखिल लहाने

शहर क्षयरोग अधिकारी मनपा डॉ. विजय चव्हान माता व बाल

संगोपन अधिकारी मनपा यांनी केले आहे. या अभियानामध्ये

वैद्यकीय आरोग्य विभाग व शहर क्षयरोग विभागातील अधिकारी व

कर्मचारी ही मोहीम यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेत

आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/hdfc-lifes-market-share-recorded-at-11/