गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त
विधानपरिषद आमदारकांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल
नियुक्ती आमदार म्हणून 12 पैकी 7 नेत्यांची वर्णी लागली आहे.
Related News
पानी फाउंडेशन महिला शेतकरी गटांनी श्रमदानातून केला वनराई बंधारा
- By अजिंक्य भारत
Rey Misterio Sr Death : प्रसिद्ध कुस्तीपटूचं निधन, रे मिस्टेरियो सीनियर यांनी वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- By अजिंक्य भारत
शिवनी विमानतळ विस्ताराचा गुंता अजूनही सुटला नसून धावपट्टीची लांबी ११०० मीटरने वाढवावी लागणार आहे
- By अजिंक्य भारत
आठवण म्हणून मूर्तिजापूर उपबिभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन
- By अजिंक्य भारत
जेव्हा अमित शाह विनोद कांबळी याच्या उत्तराने स्तिमित झाले, काय होता किस्सा ?
- By अजिंक्य भारत
“बहुचर्चित प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचे वर प्राणघातक हल्ला करणारा फरार आरोपी स्थानीक गुन्हे शाखा अकोला याचे कडुन अटक
- By अजिंक्य भारत
शपथ घेताच आ. साजिद खान पोहोचले शिवरायांच्या चरणी दर्शनाला..
- By अजिंक्य भारत
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले
- By अजिंक्य भारत
सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाचा मनमानी कारभार थांबवा
- By अजिंक्य भारत
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं…
शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एकच महत्त्वाची गोष्ट बोलले
उद्धव ठाकरे यांचा जयंतरावांना इशारा, ‘सरळ उघडपणे…’
महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी दुपारी 12
वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडला. या सात
जणांमध्ये अजित पवार गटाकडून नेते आणि छगन भुजबळ यांचे
पूत्र पंकज भुजबळ यांनी शपथ घेतली. तर शिंदे गटाच्या नेत्या
आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांनी शपथ घेतली. आता
यावर अजित पवार गटाच्या पुणे शहराध्यक्षाने नाराजी व्यक्त केली
आहे. यामुळे शहराध्यक्षासह तब्बल 600 जणांनी राजीनामा दिला
आहे. अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर हे नाराज
झाले आहेत. राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी न दिल्याने
त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे, त्यांच्यासोबत पुणे
शहरातील अजित पवार गटाच्या तब्बल 600 जणांनी राजीनामा
दिला आहे. नुकतंच याबद्दल अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक
मानकर यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली.
मी 2012 पासून पक्षाचं काम करतोय. गेले 14 महिने शहर
अध्यक्ष म्हणून काम करतोय. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून
संधी मिळावी, अशी मागणी पदाधिकारी यांनी केली होती. पंकज
भुजबळ, इद्रिस नाईकवडे यांना संधी दिली. मग मला नाकारण्याचं
कारण काय? मला इतर माणसासारखं पुढे पुढे करता येत नाही.
कार्यकर्त्यांनी स्वतःहून राजीनामे दिले आहेत. मी स्वतः राजीनामा
देतो. कार्यकर्त्यांनी राजीनामा माघारी घ्यावे. सुनील तटकरे यांनी
रुपाली चाकणकरांबद्दल तत्परता दाखवली. ती आमच्याबद्दल का
दाखवली नाही? असा प्रश्नही दीपक मानकर यांनी उपस्थित केला
आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/indias-foreign-minister-jaishankar-pakistan/