भारतातील सर्वात मोठी बंडखोरी शरद पवार गटात होणार?

भाजप

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

पक्षात म्हणजेच शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर आता इंदापुरातून

मोठी बातमी समोर येत आहे. हर्षवर्धन पाटील यांना भाजपकडून

Related News

इंदापुरातून उमेदवारी मिळणार नसल्याने त्यांनी शरद पवार गटात

प्रवेश केलाय. पण हर्षवर्धन पाटील यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने

इंदापुरातील शरद पवार गटाचे स्थानिक नेते नाराज झाले आहेत. या

नेत्यांनी आज इंदापुरात भव्य मेळावा घेत प्रचंड शक्तिप्रदर्शन केलं.

यावेळी शरद पवार गटाचे नेते तथा सोनई ग्रुप संस्थापक दशरथ माने

यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांना मोठा इशारा दिला. हर्षवर्धन पाटील

यांना इंदापुरातून उमेदवारीचा निर्णय शरद पवारांनी बदलला नाही तर

भारतातील सर्वात मोठी बंडखोरी इंदापुरात होईल, असा मोठा इशारा

दशरथ माने यांनी दिला आहे. “माझ्या राजकीय 35 वर्षाच्या कारकिर्दीत

एवढी मोठी सभा पहिल्यांदाचं बघितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला

देखील एवढे नागरिक जमत नाहीत. खासदार सुप्रिया ताई म्हणाल्या होत्या

इंदापूरला महिला जमत नाहीत. जरा हे महिलांचं मोहोळ बघा. हे

(हर्षवर्धन पाटील) पक्षात शिरले. आमच्या शरद पवारांचा तंबूच घेऊन गेले,

पण इथे बांबू आहेत ना. अजूनही विनंती आहे. ही गर्दी पाहा आणि निर्णय

बदला. निर्णय बदलला नाही तर भारतातली सगळ्यात मोठी बंडखोरी या

इंदापुरात झाल्याशिवाय राहणार नाही. सांगली पेक्षा मोठा पॅटर्न इंदापूरमध्ये

दिसणार. आम्ही एकत्र बसू आणि अपक्ष उमेदवार देऊ”, असा मोठा इशारा

सोनई ग्रुपचे संस्थापक दशरथ माने यांनी दिला. शरद पवार गटाचे नेते प्रविण

माने यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “पूर्ण इंदापुरामध्ये आज ऐतिहासिक सभा

झाली. याआधी कधीच एवढी मोठी सभा झालेली नाही. जनतेचा प्रचंड प्रतिसाद

होता. जेव्हा असा प्रतिसाद असतो तेव्हा एक वेगळा साऊंड असतो. तो लोकसभा

निवडणुकीत आपण पाहिलेला आहे. आज लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा

आहे. आव्हानानंतर तीन दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनता या ठिकाणी

आली आणि जनतेने आपला कौल दिलेला आहे. सुप्रिया सुळे ताई आणि शरद

पवार आम्हाला कालही दैवत होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत.

आजच्या जनतेचा प्रतिसाद बघून निर्णय नाही बदलला तर अपक्ष ही भूमिका

राहील. जनतेचा प्रतिसाद आहे तो नाकारू शकत नाही”, अशी भूमिका प्रविण

माने यांनी मांडली.

Read also: https://ajinkyabharat.com/all-ambedkarite-leaders-gathered-together-athavlanchi-ambedkarana-saad/

Related News