मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नरेंद्र मोदी यांना पत्र

पंतप्रधानांकडे केली मोठी मागणी

उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं आहे.

रतन टाटा यांच्या निधनमुळे भारताच्या उद्योग आणि सामाजिक

Related News

क्षेत्रात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रतन टाटा हे

त्यांच्या साधेपणा आणि दानशूर स्वभावामुळे सर्वसामान्यांमध्ये

जास्त प्रचलित होते. भारताला जेव्हा जेव्हा कठीण काळात

मदतीची गरज लागली तेव्हा रतन टाटा यांनी सढळ हातांनी

मदत केली. रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला फक्त यशाच्या

सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं नाही तर त्यांनी माणुसकीदेखील

जोपासली. त्यांनी आरोग्य क्षेत्रातही मोठं काम केलं. अनेक

सामाजिक संघटनांना आर्थिक मदत केली. अनेक सामाजिक

संघटनांसोबत ते जोडले गेले. त्यामुळे देशभरात रतन टाटा यांचं

आदराने नाव घेतलं जातं. रतन टाटा यांच्या निधननंतर संपूर्ण देश

शोकसागरात बुडाला आहे. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज

ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल महत्त्वाची

मागणी केली आहे. उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न

पुरस्काराने गौरवण्यात यावं, अशी मागणी राज ठाकरे यांनी

पत्राद्वारे केली आहे. तसेच भारतरत्न पुरस्कार हा हयात असतानाच

देण्यात यायला हवा. या विषयी काही निश्चित धोरण असणं

आवश्यक आहे. आपण ते आखाल याची आपल्याला खात्री आहे,

असं देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/todays-cabinet-will-be-closed-code-of-conduct-will-be-imposed-in-the-next-3-4-days/

Related News