अकोला :- मूर्तिजापूर येथे ६ ऑक्टोबर रोजी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. त्या अनुषंगाने सालासार रिसोर्ट मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या न्यायमंडळाने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सर्वात शेवटच्या रांगेत बसविण्यात आल्याने अवमान झालेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी सभागृहातून बहिर्गमन केले.
मोठ्या थाटामाटात येथील वकिल संघाने या कार्यक्रमाचे आयोजन केले, नियोजित पाहुण्यांनाही कार्यक्रमाला हजेरी लावली, मात्र कार्यक्रमस्थळी सर्व सामान्य नागरीक पहिल्या दुसऱ्या रांगेत बसल्याचे निदर्शनास आले, लोकशाहीच्या कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंळ आणि प्रसार माध्यमे ही चार आधारस्तंभ असताना एका स्तंभाने दुसऱ्या आधारस्तंभाचा अवमान केल्याने संतापजनक प्रतिक्रिया प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी व्यक्त केल्या. न्यायालयच्या नियोजित इमारती संदर्भात उपस्थितांनी संशय व्यक्त केला असून इमारतीला दिलेल्या कमानी या मोगलकालीन असल्याची चर्चा होती, आर्किटेक कोण असावा हाही संशोधनाचा विषय आहे, गाजावाजा करुन करण्यात आलेल्या कार्यक्रमात म्हणावी तशी नागरिकांची उपस्थिती नगण्य होती.