पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त ठाण्यातील वाहतुकीत मोठे बदल

महिला सशक्तीकरण कार्यक्रमासह विविध प्रकल्पाच्या

भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या ठाण्यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाण्यातील घोडबंदर रोड भागात दौरा

Related News

आयोजित करण्यात आला आहे. घोडबंदर रोडवरील वालावलकर

मैदानावर उद्या संध्याकाळी 4 वाजता भव्य कार्यक्रम आयोजित

करण्यात आला आहे. यानिमित्ताने मोठी जय्यत तयारीही केली

जात आहे. त्यासोबतच वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ठाणे

शहरातील वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ठाणे

शहर वाहतूक नियंत्रण शाखेने याबद्दलची महत्त्वाची माहिती दिली

आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे दौऱ्यासाठी पावसाचा

अंदाज घेऊन मुख्य सभामंडपाच्या ठिकाणी भव्य तिहेरी

आच्छादित तंबू उभारण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान,

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

त्यामुळे सभास्थानापासून 800 मीटर अंतरावर तीन हेलीपॅड

बनवण्यात आले आहेत. तसेच 40 हजारांपेक्षा जास्त नागरिकांच्या

बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच मैदानापासून

काही अंतरावर 12 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असणार आहे.

पंतप्रधान मोदी सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासह ठाण्यातील

अंतर्गत मेट्रो, नवीन महापालिका मुख्यालय, नैना पायाभूत सुविधा

प्रकल्प यांचे भूमिपूजन करणार आहेत. ठाणे वाहतूक नियंत्रण

शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी ठाण्यात ही

वाहतूक बदल करण्याचे आदेश दिले आहेत. ही वाहतूक

अधिसूचना 3 ऑक्टोबरपासून रात्री ते कार्यक्रम संपेपर्यंत असणार

आहे. पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर,

ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना

हा आदेश लागू राहणार नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/supreme-court-sets-up-sit-to-investigate-tirupati-laddu-case/

Related News