मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या शिवाय आचारसंहिता लावू नये -मनोज जरांगे

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी मराठा

आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 16 सप्टेंबरपासून उपोषण

सुरू केले होते. लोकांच्या आग्रहाखातर दहा दिवसानंतर त्यांनी

Related News

उपोषण मागे घेतले. आज छत्रपती संभाजीनगर येथील

रुग्णालयात त्यांना डिस्टार्च मिळाला. नारायगडावरील दसरा

मेळाव्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यापूर्वी त्यांनी मराठा

समाजाच्या मागण्यासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. त्यांनी

मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या शिवाय आचारसंहिता लावू

नये असा इशारा राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला दिला

आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या शिवाय आचारसंहिता

लावू नये, अशी मोठी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली

आहे. अर्थात त्यांनी अजून त्यांचे पत्ते उघडले नाहीत. लोकसभेचा

दाखला देत त्यांनी राज्य सरकारला विधानसभेतील परिणामाचा

अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. लोकसभेच्या वेळेस सांगितले होते

आणि आताही सांगत, मराठ्याच्या मागण्या पूर्ण करा, असे ते

म्हणाले. आरक्षण न देता निवडणुका लावल्यास सरकारला

पश्चाताप होईल, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Read also: https://ajinkyabharat.com/state-governments-decision-to-stop-rs-100-stamp/

Related News