बदलापूर येथील एका शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार
करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर
केल्यानंतर आता त्याचा दफनविधी वादात सापडला आहे. अक्षय
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
शिंदे याचं एन्काऊंटर प्रकरण वादात असल्याने कोर्टात सुनावणी
सुरु आहे. त्यामुळे भविष्यात पुराव्यांची आवश्यकता लागू शकते.
त्यामुळे अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचं दहन करण्याऐवजी दफन
करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण अक्षय शिंदे याच्या
मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नसल्याचं चित्र आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकार अक्षय शिंदे याच्या
मृतदेहाला दफन करण्यासाठी जागा शोधत आहे. पण
ठिकठिकाणी स्थानिकांच्या होणाऱ्या विरोधामुळे अक्षयच्या
अंत्यसंस्कारासाठी जागा मिळणं कठीण होऊन बसलं आहे.
प्रशासनाने उल्हासनगर येथे अक्षय शिंदे याच्या दफनविधीसाठी
जागा शोधली होती. पण तिथे देखील स्थानिकांनी विरोध केलाय.
विशेष म्हणजे स्थानिकांनी अक्षय शिंदे याच्या दफनविधीसाठी
खोदलेला खड्डाच बुजवला आहे. त्यामुळे प्रशासनापुढच्या अडचणी
वाढल्या आहेत. अक्षयचा मृत्यू होऊन आता सहा दिवस झाली
आहेत, तरीही त्याच्या अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नसल्यामुळे
प्रशासनापुढील आव्हान वाढत आहे.
उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यासाठी खड्डा
खोदण्यात आला होता. पण तिथे शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी
आणि इतर स्थानिक महिला जमल्या. त्यांनी अक्षयचा मृतदेह इथे
दफन केला जाऊ शकत नाही, असं म्हणत विरोध केला. यावेळी
महिलांनी अक्षयच्या दफनसाठी खोदलेला खड्डा बुजवला. महिला
आक्रमक झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी
दाखल झाले. पण महिलांनी खड्डा बुजवला. या आंदोलनात
तृतीयपंथी देखील सहभागी झाले होते.
Read also: https://ajinkyabharat.com/pardeshi-scholarship-approved-for-75-obc-students/