भारतातर्फे ऑस्करसाठी ‘लापता लेडीज’ची अधिकृत एंट्री!

प्रसिद्ध दिग्दर्शक किरण राव हिने दिग्दर्शित केलेल्या ‘लापता

लेडीज’ या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर धूमाकूळ माजवला.

फक्त क्रिटीक्स नव्हे तर लोकांनाही हा चित्रपट खूप आवडला,

Related News

त्याचे प्रचंड कौतुकही झाले. आता या चित्रपटाच्या क्रू साठी

आणखी एक आनंदाची बातमी आहे. भारताकडून ऑस्करसाठी

‘लापता लेडीज’ ची निवड झाली आहे. 2025 च्या ऑस्कर

पुरस्कारासाठी लापता लेडीज चित्रपटाची निवड झाल्याची घोषणा

करण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्श, कलाकार, तंत्रज्ञ

आणि इतर क्रू यांच्यासाठी हा अतिशय आनंदाचा , अभिमानाचा

क्षण आहे. 97 व्या अकादमी पुरस्कार (ऑस्कर 2025) साठी

भारतातर्फे किरण राव हिने दिग्दर्शित केलेल्या ‘लापता लेडीज’ची

एंट्री झाली आहे. सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी या

चित्रपटाला नामांकन मिळाले आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा

करण्यात आली आहे. ‘द फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या

सदस्यांनी अकादमी पुरस्कारांसाठी भारताच्याफ् अधिकृत

प्रवेशाची घोषणा केली आहे. आमिर खान प्रॉडक्शन अंतर्गत

बनलेल्या या चित्रपटात प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव आणि

नितांशी गोयल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात रवी

किशन आणि छाया कदम यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली

आहे. पितृसत्ताक पद्धतीवर हलक्या-फुलक्या पद्धतीने टिप्पणी

करणारा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट 29 चित्रपटांच्या यादीतून

ऑस्करसाठी निवडण्यात आला. या यादीत बॉलिवूडचा ‘ॲनिमल’,

राष्ट्रीय पुरस्कार विजता मल्याळम चित्रपट ‘आट्टम’ आणि कान्स

फिल्म फेस्टिव्हलमध्ये चर्चेत आलेला ‘ऑल वुई इमॅजिन इज

लाइट’ या चित्रपटांचा समावेश होता. आसामी दिग्दर्शक जाह्नू

बरुआ यांच्या अध्यक्षतेखालील 13 सदस्यांच्या निवड समितीने

एकमताने आमिर खान आणि किरण राव निर्मित ‘लापता

लेडीज’चा अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट

श्रेणीत समावेश करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाने तमिळ

चित्रपट ‘महाराजा’, तेलुगू चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ आणि

‘हनु-मान’ यांनाही मागे टाकले आहे. 29 चित्रपटांच्या यादीत

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ आणि ‘अनुच्छेद 370’ यांचाही समावेश होता.

Read also: https://ajinkyabharat.com/manoj-jarangenas-gesture-if-something-happens/

Related News