‘हीरामंडी’ फेम बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि
‘रंग दे बसंती’ फेम लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ हे दोघं नुकतेच
विवाहबंधनात अडकले आहेत. अदितीने इन्स्टाग्रामवर लग्नाचे
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
सुंदर फोटो शेअर करत तिच्या सर्व चाहत्यांना सुखद दिला आहे.
या दोघांच्या लग्नाची कुठेच चर्चा नव्हती. अदिती-सिद्धार्थचे निवडक
मित्रमंडळी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार
पडला आहे. अदिती-सिद्धार्थचा विवाहसोहळा दाक्षिणात्य पद्धती
नुसार पार पडला. अभिनेत्रीने लग्नात गोल्डन जरी एम्ब्रॉयडरी असलेली
सोनेरी रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. तर, सिद्धार्थने दाक्षिणात्य
परंपरेनुसार पांढरा कुर्ता घालून लुंगी नेसली होती. अदितीने शेअर केलेल्या
फोटोंनी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोघेही या फोटोंमध्ये
अतिशय सुंदर दिसत आहेत. या जोडप्याने तेलंगणा वानपर्थी येथील 400
वर्षे जुन्या मंदिरात त्यांचा विवाहसोहळा आयोजित केला होता.
अभिनेत्री कॅप्शनमध्ये लिहिते, “तू माझा सूर्य आहेस, चंद्र आहेस आणि
माझ्यासाठी तूच माझा तारा आहेस. लव्ह, लाइट अँड मॅजिक…मिस्टर
अँड मिसेस अदु-सिद्धु” अभिनेत्रीच्या पोस्टवर सध्या नेटकऱ्यांसह
कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/chief-minister-eknath-shinde-wakes-up-to-strike-rate-and-potential/